अमेरिका-इराण युद्धासाठी इस्रायल सतर्क, आयर्न डोम सक्रिय; आणखी एक युद्ध सुरू होणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2026 16:05 IST2026-01-14T15:46:02+5:302026-01-14T16:05:56+5:30
मागील २४ तासांत इस्रायलच्या हवाई संरक्षण प्रणालींमध्ये बदल करण्यात आले आहेत, यामध्ये आयर्न डोम इंटरसेप्टर सिस्टम तैनात करण्यात आले आहेत.

अमेरिका-इराण युद्धासाठी इस्रायल सतर्क, आयर्न डोम सक्रिय; आणखी एक युद्ध सुरू होणार?
मागील काही दिवसांपासून इराण आणि अमेरिकेमध्ये संबंध बिघडले आहेत. इराणमध्ये सरकारविरोधात निदर्शने सुरू केली आहेत, या निदर्शनांना ट्रम्प यांनी पाठिंबा दिला आहे. इराणसोबत तणाव वाढण्याची शक्यता आहे, यामुळे इस्रायलने लष्करी तयारी वाढवली आहे. इराणशी संभाव्य लष्करी संघर्ष होण्याची शक्यता असल्याने इस्रायल डिफेन्स फोर्सेसने तयारी वाढवली आहे. अनेक युनिट्सना हाय अलर्टवर ठेवले आहे.
पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या कार्यालयाने सांगितले की, इराणशी संबंधित घडामोडींवर चर्चा करण्यासाठी राजकीय-सुरक्षा मंत्रिमंडळाची पूर्वी नियोजित बैठक बोलावण्यात आली आहे.
'स्वयंपाक, मुले जन्माला घालणे, हेच उत्तर भारतीय महिलांचे काम', DMK खासदाराचे वादग्रस्त वक्तव्य
गेल्या २४ तासांत इस्रायलच्या हवाई संरक्षण प्रणालींमध्ये बदल करण्यात आले आहेत, यामध्ये आयर्न डोम इंटरसेप्टर सिस्टमची तैनाती समावेश आहे. जोपर्यंत अमेरिका इराणी भूभागावर मोठ्या प्रमाणात हल्ला करत नाही तोपर्यंत इराण इस्रायलवर हल्ला करणार नाही, असा विश्वास अधिकाऱ्यांचा असल्याचे वृत्त इस्रायली सार्वजनिक प्रसारक कान यांनी दिले.
सध्या, राखीव सैन्याला तात्काळ बोलावण्याचे कोणतेही आदेश जारी केलेले नाहीत आणि आयडीएफकडून कोणतीही अधिकृत टिप्पणी आलेली नाही. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणी लोकांना त्यांचे निदर्शने सुरू ठेवण्याचे आवाहन केले होते आणि "मदत लवकरच मिळेल" असे म्हटले होते, या भाष्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे.
गेल्या वर्षी जूनमध्ये इस्रायल आणि इराणमध्ये १२ दिवसांचे युद्ध सुरू झाले होते, त्या दरम्यान इस्रायली युद्धविमानांनी इराणी लष्करी तळांवर हल्ला केला होता.
इराणमध्ये २,५०० हून अधिक मृत्यू
इराणमध्ये निदर्शकांवर झालेल्या कारवाईत मृतांचा आकडा २,५७१ वर पोहोचला आहे, अशी घोषणा अमेरिकेच्या मानवाधिकार संघटनेने बुधवारी केली. काही दिवसापूर्वी घटनांदरम्यान अचूक माहिती देण्यासाठी आणि इराणमधील समर्थकांकडून माहिती पडताळण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या अमेरिकेतील ह्युमन राईट्स अॅक्टिव्हिस्ट न्यूज एजन्सीने ही आकडेवारी दिली आहे.
मृतांमध्ये २,४०३ निदर्शक आणि १४७ सरकारी अधिकारी यांचा समावेश आहे. मृतांमध्ये १२ मुले आणि नऊ नागरिकांचा समावेश आहे हे निदर्शनांमध्ये सहभागी नव्हते.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी सांगितले की, निदर्शनांवर कारवाई सुरू असताना त्यांनी इराणी अधिकाऱ्यांशी चर्चा रद्द केली आहे. त्यांनी इराणी नागरिकांना असेही सांगितले की, "मदत लवकरच मिळेल." राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी मदतीच्या स्वरूपाची माहिती दिली नाही.