इस्रायलचा इराणवर सर्वात मोठा हवाई हल्ला; एकाच रात्रीत २५० बॉम्बचा मारा, ३०० क्षेपणास्त्रे नष्ट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2026 11:14 IST2026-03-05T11:12:46+5:302026-03-05T11:14:25+5:30

Israel-Iran War News: मध्यपूर्वेतील संघर्ष आता एका भीषण वळणावर येऊन पोहोचला आहे. युद्धाच्या सहाव्या दिवशी इस्रायल आणि अमेरिकेने संयुक्तपणे इराणवर सर्वात मोठा हल्ला केल्याची बातमी समोर येत आहे.

Israel Mega Strike on Iran: 100 Fighter Jets Rain 250 Bombs on Tehran; IRGC HQ Destroyed | इस्रायलचा इराणवर सर्वात मोठा हवाई हल्ला; एकाच रात्रीत २५० बॉम्बचा मारा, ३०० क्षेपणास्त्रे नष्ट!

इस्रायलचा इराणवर सर्वात मोठा हवाई हल्ला; एकाच रात्रीत २५० बॉम्बचा मारा, ३०० क्षेपणास्त्रे नष्ट!

मध्यपूर्वेतील संघर्ष आता एका भीषण वळणावर येऊन पोहोचला आहे. युद्धाच्या सहाव्या दिवशी इस्रायल आणि अमेरिकेने संयुक्तपणे इराणवर सर्वात मोठा हल्ला केल्याची बातमी समोर येत आहे. इस्रायलने १०० हून अधिक लढाऊ विमानांनी इराणची राजधानी तेहरानसह अनेक महत्त्वाच्या ठिकाणांना लक्ष्य केले. या मोठ्या लष्करी कारवाईमुळे जागतिक स्तरावर चिंतेचे वातावरण पसरले असून, इराण या हल्ल्याला काय प्रत्युत्तर देणार याकडे जगाचे लक्ष लागले आहे.

इस्रायली हवाई दलाने अत्यंत अचूक गुप्त माहितीच्या आधारे पूर्व तेहरानमधील इराणी रिव्होल्यूशनरी गार्ड्सच्या हेडक्वार्टर हल्ला चढवला. या मोहिमेदरम्यान २५० हून अधिक बॉम्बने हल्ला करण्यात आले. इस्रायलच्या दाव्यानुसार, या लष्करी कारवाईत रिव्होल्यूशनरी गार्ड्सच्या हेडक्वार्टर, गुप्तचर विभाग, सुरक्षा दल आणि सायबर युद्ध युनिट यांचे मोठे नुकसान झाले आहे.

इस्रायली लष्कराचे प्रवक्ते ब्रिगेडियर जनरल एफी डेफ्रिन यांनी दिलेल्या माहितीनुसार, या कारवाईत इराणच्या सुमारे ३०० संरक्षण प्रणाली आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे नष्ट करण्यात आली आहेत. इतकेच नव्हे तर, इराणी अणुऊर्जा प्रकल्पातील काही महत्त्वाच्या ठिकाणांनाही लक्ष्य केल्याचा दावा आयडीएफने केला आहे.

लेबनॉनमध्ये इस्रायली हल्ले

एकीकडे इराणवर हल्ले सुरू असताना, दुसरीकडे इस्रायलने लेबनॉनमधील हिजबुल्लाहच्या तळांविरुद्धची मोहीम तीव्र केली आहे. राजधानी बेरूत, टायर आणि दक्षिण लेबनॉनमधील अनेक ठिकाण हवाई हल्ल्यात उद्ध्वस्त करण्यात आली आहेत. दक्षिण लेबनॉनच्या सीमेवरील भागात आयडीएफ सैन्य तैनात करण्यात आले आहे. वृत्तानुसार, लेबनॉनमध्ये आतापर्यंत ७० लोक ठार झाले आहेत आणि ४०० हून अधिक जखमी झाले आहेत.

Web Title : ईरान पर इस्राइल का भीषण हवाई हमला: सैकड़ों मिसाइलें नष्ट

Web Summary : इस्राइल और अमेरिका ने संयुक्त रूप से ईरान पर बड़ा हमला किया, जिसमें तेहरान और अन्य महत्वपूर्ण स्थानों को निशाना बनाया गया। सैकड़ों मिसाइलें और ईरानी रक्षा प्रणालियाँ नष्ट हो गईं। साथ ही, इस्राइल ने लेबनान में हिजबुल्लाह पर हमले तेज किए, जिससे कई हताहत हुए और भारी क्षति हुई।

Web Title : Israel's Massive Airstrike on Iran: Hundreds of Missiles Destroyed

Web Summary : Israel and US jointly launched a major attack on Iran, targeting Tehran and other key locations. Hundreds of missiles and Iranian defense systems were reportedly destroyed. Simultaneously, Israel intensified attacks on Hezbollah in Lebanon, causing numerous casualties and significant damage.