'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 17:36 IST2025-06-18T17:35:22+5:302025-06-18T17:36:13+5:30

Israel-Iran War: 'इराण कोणत्याही प्रकारच्या जबरदस्तीसमोर झुकणार नाही.'

Israel-Iran War: 'War imposed on us; will not surrender', Khamenei's direct warning to Israel and America | 'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा

'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा

Israel-Iran War:इराण आणि इस्रायलमधील वाढत्या संघर्षादरम्यान इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खमेनी यांनी मंगळवारी(दि.18) राष्ट्राला संबोधित केले. यावेळी खमेनी यांनी स्पष्टपणे सांगितले की, इराणी जनता शहीदांचे बलिदान कधीही विसरणार नाही. यावेळी त्यांनी इस्रायलसह अमेरिकेलाही कडक शब्दात इशारा दिला. अमेरिका किंवा इतर कोणत्याही देशाने इराणविरोधात लष्करी कारवाई केली, तर त्यांचे कधीही भरुन न येणारे नुकसान केले जाईल, असे खमेनी म्हणाले.

अमेरिकेला इशारा
इराणच्या प्रमुखांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीलाही प्रत्युत्तर दिले. त्यांनी इशारा दिला की, इराण धमकी देणारी भाषा अजिबात सहन करणार नाही. आमच्यावर युद्ध लादले गेले आहे, आम्ही त्यात कधीही आत्मसमर्पण करणार नाही. अमेरिकेचा कोणत्याही प्रकारचा लष्करी हस्तक्षेप नुकसान वाढवणारे असेल, असेही त्यांनी यावेळी म्हटले. 

इस्रायलला याची किंमत मोजावी लागेल
आपल्या भाषणात अयातुल्ला खमेनी यांनी इस्रायलने केलेल्या हल्ल्याचे वर्णन मूर्ख आणि द्वेषपूर्ण असल्याचे म्हटले. हा हल्ला इराणी नागरिकांच्या सहनशीलतेची परीक्षा घेण्यासारखे आहे. आम्ही लादलेले युद्ध किंवा लादलेली शांतता स्वीकारणार नाही. हे राष्ट्र कधीही कोणत्याही प्रकारच्या जबरदस्तीसमोर झुकणार नाही. आमचे सशस्त्र दल पूर्णपणे तयार आहेत, असेही त्यांनी यावेळी म्हटले. खामेनी यांनी जोर देऊन सांगितले की, इस्रायलने एक गंभीर चूक केली आहे आणि त्यासाठी त्यांना गंभीर परिणाम भोगावे लागतील. 

Web Title: Israel-Iran War: 'War imposed on us; will not surrender', Khamenei's direct warning to Israel and America

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.