'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 19:00 IST2025-06-17T18:59:51+5:302025-06-17T19:00:54+5:30

Israel-Iran War: इस्रायल-इराण संघर्षादरम्यान इराणचे सुप्रीम लीडर खमेनी यांना हत्येची भीती सतावत आहे.

Israel-Iran War: 'Situation like Saddam Hussein...', Israel's direct warning to Iranian leader Ayatollah Ali Khamenei | 'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा

'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा

Israel-Iran War: इराण आणि इस्रायलमध्ये गेल्या काही दिवसांपासून भीषण युद्ध सुरू आहे. या युद्धादरम्यानइस्रायलने, इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट धमकी दिली आहे. इस्रायली संरक्षण मंत्री काट्झ यांनी म्हटले की, इराणचा शेजारील देश इराक, जो इस्रायलच्या विरोधात होता, त्याच्या हुकूमशहाचे काय झाले, ते आठवा. खमेनी यांना सद्दाम हुसेन याच्यासारखेच भोगावे लागेल. 

संरक्षण मंत्री काट्झ यांचे हे विधान अशा वेळी आले आहे, जेव्हा इस्रायलने खमेनी यांच्या हत्येची योजना आखली होती, पण अमेरिकेने त्यांना तसे करण्यापासून रोखल्याचे वृत्त माध्यमांमध्ये आले आहे. एका वरिष्ठ अमेरिकन अधिकाऱ्याने रॉयटर्स न्यूज एजन्सीला सांगितले होते की, आतापर्यंत इराणींनी एकाही अमेरिकन व्यक्तीला मारलेले नाही, त्यामुळे अमेरिका इराणच्या राजकीय नेतृत्वालाही लक्ष्य करणार नाही. त्यानंतर फॉक्स न्यूजशी बोलताना इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी इराणमध्ये सत्ता बदल होण्याची शक्यताही वर्तवली.

इराण-इस्रायल संघर्षावर अमेरिकन अध्यक्ष काय म्हणतात?
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणतात की, त्यांना इराण आणि इस्रायलमध्ये फक्त युद्धविराम नको आहे, तर समस्येचे समाधान हवे आहे. इस्रायलने इराणच्या अणुभट्ट्यांवर हल्ला केला आहे. इस्रायल म्हणतो की, इराण अणुभट्ट्यांच्या नावाखाली अणुबॉम्ब बनवत आहे. मात्र, इराणने या दाव्याचे खंडन केले आहे. दरम्यान, अमेरिका इराणला अणुबॉम्ब बनवण्यापासून रोखण्यासाठी इराणशी नवीन अणुकरार करण्याचा प्रयत्न करत आहे. यासाठी सुरू असलेल्या चर्चेत अमेरिका इराणने त्याचे युरेनियम समृद्धीकरण थांबवावे अशी मागणीही केली आहे. 

Web Title: Israel-Iran War: 'Situation like Saddam Hussein...', Israel's direct warning to Iranian leader Ayatollah Ali Khamenei