रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 16:42 IST2025-06-19T16:40:30+5:302025-06-19T16:42:10+5:30
Israel Iran war: इस्रायलने १३ जूनला जोरदार हल्ला केला. इस्रायल २०० लढाऊ विमाने घेऊन घुसला होता. इराणने थोडाफार प्रतिकार केला परंतू जे नुकसान झाले तो जबरदस्त होते. आता तर इस्रायलने इराणच्या आकाशावर पूर्णपणे नियंत्रण मिळविले आहे.

रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
पाकिस्तानसोबतच्या हवाई युद्धात भारताच्या हवाई सुरक्षा प्रणालीने पाकिस्तानचे ड्रोन, मिसाईल हल्ले हवेतच परतवून लावले होते. यात रशियाने दिलेल्या एस ४०० चा मोठा वाटा होता. हीच एअर डिफेन्स सिस्टीम रशियाने इराणला देऊ केली होती. परंतू, इराणने तिकडे लक्ष दिले नाही. थोडक्यात नाकारले आणि आज इस्रायलच्या हल्ल्यात इराणने आपले बहुतांश बडे अधिकारी गमावले आहेत.
इराणचे सर्वेसर्वा खामेनेई मुळचे भारतातील...; पणजोबा इराणला गेले, वडिलांनी क्रांती घडविली अन्...
इस्रायलने १३ जूनला जोरदार हल्ला केला. इस्रायल २०० लढाऊ विमाने घेऊन घुसला होता. इराणने थोडाफार प्रतिकार केला परंतू जे नुकसान झाले तो जबरदस्त होते. आता तर इस्रायलने इराणच्या आकाशावर पूर्णपणे नियंत्रण मिळविले आहे. रशियाची एअर डिफेन्स सिस्टीम असती तर इराण एवढा असहाय्य दिसला नसता.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी इराण आणि इस्रायलमध्ये मध्यस्थी करण्याची तयारी दर्शविली आहे. यावेळी त्यांनी रशियाने इराणला हवाई संरक्षण प्रणालीच्या क्षेत्रातील प्रकल्पांची ऑफर दिली होती. तेहरानने त्यात फारसा रस दाखवला नाही, असे पुतीन म्हणाले आहेत. आघाडीच्या वृत्तसंस्थांशी बोलताना पुतीन यांनी हा गौप्यस्फोट केला. इराणसोबतच्या धोरणात्मक भागीदारीबद्दल करार केला होता, त्यात संरक्षणाचा मुद्दा नव्हता, तरीही आम्ही त्यांना ही ऑफर दिली होती. ही वेगळी गोष्ट असली तरी त्यात व्यावहारिक असे काही नव्हते, असे पुतीन म्हणाले.
इराण आताही अणुकार्यक्रम राबवू शकतो....
मॉस्को अशा करारावर पोहोचण्यास मदत करू शकतो ज्या अंतर्गत इराण त्याच्या अणुकार्यक्रमावर शांततेने पुढे जाऊ शकेल आणि इस्रायलच्या सुरक्षा चिंता देखील कमी होऊ शकतील. यासाठी आपण मध्यस्थी करण्यास तयार असल्याचे पुतीन म्हणाले. रशियाचा प्रस्ताव इराण, इस्रायल आणि अमेरिकेसोबत शेअर केला असल्याचे देखील पुतीन यांनी सांगितले. हा निर्णय या सर्व देशांच्या, प्रामुख्याने इराण आणि इस्रायलच्या राजकीय नेतृत्वावर अवलंबून आहे, असेही ते म्हणाले.