पी.व्ही. सिंधू इंग्लंडला निघालेली, दुबई विमानतळावर अडकली; विमाने रद्द, चेन्नई, बंगळुरू विमानतळांवर प्रवासी अडकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2026 00:00 IST2026-03-01T00:00:03+5:302026-03-01T00:00:56+5:30

Israel Iran War Marathi News: इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरले! २०० लढाऊ विमानांच्या हल्ल्यात २०१ जणांचा मृत्यू झाला आहे. बॅडमिंटन स्टार पीव्ही सिंधू दुबई विमानतळावर अडकली असून अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. सविस्तर वाचा.

Israel Iran War Marathi News: PV Sindhu leaves for England, gets stuck at Dubai airport; Flights cancelled, passengers stranded at Chennai, Bengaluru airports | पी.व्ही. सिंधू इंग्लंडला निघालेली, दुबई विमानतळावर अडकली; विमाने रद्द, चेन्नई, बंगळुरू विमानतळांवर प्रवासी अडकले

पी.व्ही. सिंधू इंग्लंडला निघालेली, दुबई विमानतळावर अडकली; विमाने रद्द, चेन्नई, बंगळुरू विमानतळांवर प्रवासी अडकले

तेहरान: मध्य पूर्वेतील तणावाचे रूपांतर आता महायुद्धात झाले आहे. शनिवारी सकाळी इस्रायलच्या २०० लढाऊ विमानांनी इराणच्या लष्करी तळांवर भीषण बॉम्बफेक केली. या हल्ल्यात आतापर्यंत २०१ जणांचा मृत्यू झाला असून ७४७ लोक जखमी झाले आहेत. या युद्धाचा फटका जागतिक विमानसेवेला बसला असून भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू देखील दुबई विमानतळावर अडकली आहे. चेन्नई, बंगळुरूसह सर्व ठिकाणची आंतरराष्ट्राय विमानसेवा ठप्प झाली असून हजारो प्रवासी अडकले आहेत.  

एअर इंडिया, इंडिगो, अकासा या विमान कंपन्यांनी आपली विमानसेवा २ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या मार्गावरील सर्व विमानफेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. 

इस्रायली हवाई दलाच्या इतिहासातील हा सर्वात मोठा ऑपरेशन असल्याचे मानले जात आहे. सुमारे २०० फायटर जेट्सनी इराणमधील ५०० लक्ष्यांवर शेकडो क्षेपणास्त्रे डागली. यात प्रामुख्याने एअर डिफेन्स सिस्टम आणि मिसाइल लाँचर्सना उद्ध्वस्त करण्यात आले आहे.

पी.व्ही. सिंधू दुबईत अडकली
'ऑल इंग्लंड' स्पर्धेसाठी जात असलेली पी.व्ही. सिंधू दुबई विमानतळावर अडकली आहे. बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडिया (BAI) एमिरेट्स एअरलाईन्सच्या संपर्कात असून तिला सुरक्षितपणे बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

भारतात हाय अलर्ट
इराण आणि मध्य पूर्वेतील हवाई क्षेत्र बंद झाल्यामुळे भारत सरकारने दिल्लीत २४x७ कंट्रोल रूम स्थापन केली आहे. चेन्नई आणि बेंगळुरू विमानतळांवरून जाणारी अनेक उड्डाणे रद्द करण्यात आली असून प्रवाशांचे हाल होत आहेत.

कतारमध्ये आणीबाणी
कतारवरही ४४ क्षेपणास्त्रे आणि ८ ड्रोनने हल्ला करण्यात आला आहे. यामुळे कतारमधील सर्व सार्वजनिक कार्यक्रम आणि हॉटेलमधील सभा अनिश्चित काळासाठी रद्द करण्यात आल्या आहेत.

Web Title : मध्य पूर्व संकट में पी.वी. सिंधु दुबई में फंसी

Web Summary : मध्य पूर्व में बढ़ते तनाव के कारण पी.वी. सिंधु दुबई में फंसीं। उड़ानें रद्द, चेन्नई, बेंगलुरु हवाई अड्डों पर यात्री फंसे। भारत में हाई अलर्ट, नियंत्रण कक्ष स्थापित। कतर पर हमले, कार्यक्रम रद्द।

Web Title : PV Sindhu Stranded in Dubai Amid Middle East Conflict

Web Summary : Escalating Middle East tensions trap PV Sindhu in Dubai. Flights cancelled, travelers stranded at Chennai, Bengaluru airports. India on high alert, control room established. Qatar faces attacks, events cancelled.