"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 16:57 IST2025-06-17T16:57:28+5:302025-06-17T16:57:48+5:30

इराणच्या उत्तर-पश्चिमेकडील तबरीज शहरात मंगळवारी दोन जबरदस्त स्फोट झाले... महत्वाचे म्हणजे, तबरीज येथे इराणचे एक मुख्य हवाई तळही आहे...

israel iran war Khamenei directly threatens Israel by sharing a verse from the Quran | "अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!

"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!

इराण आणि इस्रायल यांतील संघर्ष शिगेला पोहोचला आहे. यातच, इराणचे सर्वोच्च नेता आयतुल्ला अली खामेनेई यांनी एक धार्मिक मेसेजच्या माध्यमाने इस्रायलला थेट इशारा दिला आहे. त्यांनी त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर (X) पवित्र कुरानची एक आयत पोस्ट केली आहे. "अल्लाहची मदत आणि लवकरच येणारा विजय"(कुरान 61:13). अल्लाहच्या इच्छेने इस्लामिक राष्ट्र, यहूदी राजवटीवर (Zionist regime) विजय मिळवेल."

खामेनेई यांच्या या मेसेजकडे, इस्रायलला थेट इशारा म्हणून बघितले जात आहे. महत्वाचे म्हणजे, इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्ष शिगेला पोहोचला असतानाच खामेनेई यांनी ही पोस्ट केली आहे.

इराणच्या तबरीज शहरात दोन मोठे स्फोट - 
इराणच्या उत्तर-पश्चिमेकडील तबरीज शहरात मंगळवारी दोन जबरदस्त स्फोट झाले. हम मिहन वृत्त पत्राने दिलेल्या वृत्तानुसार, हे दोन्ही स्फोट पाच मिनिटांच्या अंतराने झाले. इराणी वृत्तसंस्था मेहरने याची पुष्टी करत स्फोटानंतर शहरात धुराचे लट दिसत होते. याशिवाय या स्फोटांचे व्हडिओ फुटेजही समोर आले आहे. महत्वाचे म्हणजे, तबरीज येथे इराणचे एक मुख्य हवाई तळही आहे. 

जेरुसलेम आणि तेल अवीवमध्ये मोठे स्फोट -
जेरुसलेम आणि तेल अवीव या दोन्ही शहरांत मंगळवारी सकाळच्या सुमारास मोठे स्फोट झाल्याचे वृत्त आहे. इराणने डागलेल्या मिसाइल्सच्या इशाऱ्यानंतर, संपूर्ण इस्रायलमध्ये एअर रेड सायरन वाजवण्यात आला आणि नागरिकांना बॉम्ब शेल्टरमध्ये जाण्याचे निर्देश देण्यात आले. यासंदर्भात इस्रायली लष्कराने एक निवेदन जारी करत, इराणने इस्रायलकडे मिसाइल डागल्यानंतर, अनेक भागांत सायरन वाजवण्यात आले आहेत. तसेच, आपण मिसाइल्स इंटरसेप्ट करण्यासाठी आणि आवश्यक ठिकानी हल्ला करण्यासाठी सक्रियपणे कारवाई करत आहोत, असेही  IDF ने म्हटले आहे.

Web Title: israel iran war Khamenei directly threatens Israel by sharing a verse from the Quran

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.