इस्त्रायलचा रशिया-इराणवर मोठा 'सर्जिकल स्ट्राईक'! कॅस्पियन समुद्रातील शस्त्र पुरवठा साखळी उद्ध्वस्त; पहिल्यांदाच उत्तर इराणवर हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2026 08:22 IST2026-03-25T08:21:37+5:302026-03-25T08:22:07+5:30

Israel Iran War 2026: इस्त्रायलने पहिल्यांदाच कॅस्पियन समुद्रात केला हल्ला. रशिया आणि इराणमधील शस्त्र पुरवठा साखळी उद्ध्वस्त. बंदर अंजली पोर्टवर इस्त्रायली हवाई दलाचा मोठा प्रहार.

Israel Iran War 2026: Israel's major 'surgical strike' on Russia-Iran! Weapons supply chain in the Caspian Sea destroyed; Attack on northern Iran for the first time | इस्त्रायलचा रशिया-इराणवर मोठा 'सर्जिकल स्ट्राईक'! कॅस्पियन समुद्रातील शस्त्र पुरवठा साखळी उद्ध्वस्त; पहिल्यांदाच उत्तर इराणवर हल्ला

इस्त्रायलचा रशिया-इराणवर मोठा 'सर्जिकल स्ट्राईक'! कॅस्पियन समुद्रातील शस्त्र पुरवठा साखळी उद्ध्वस्त; पहिल्यांदाच उत्तर इराणवर हल्ला

तेल अवीव/तेहरान: मध्य पूर्वेतील युद्धाने आता भौगोलिक सीमा ओलांडून एका धोकादायक वळणावर प्रवेश केला आहे. इस्त्रायलने प्रथमच उत्तर इराणमधील कॅस्पियन समुद्रात मोठी लष्करी कारवाई करत रशिया आणि इराणमधील अत्यंत महत्त्वाची शस्त्र पुरवठा साखळी उद्ध्वस्त केल्याचा दावा केला आहे. या हल्ल्यामुळे मॉस्को आणि तेहरान यांच्यातील लष्करी युतीला मोठा धक्का बसला आहे.

'बंदर अंजली' पोर्टवर भीषण हल्ला 
इस्त्रायली हवाई दलाने (IAF) उत्तर इराणमधील 'बंदर अंजली' या महत्त्वाच्या बंदरावरील इराणी नौदलाच्या तळाला लक्ष्य केले. १८ मार्च २०२६ रोजी झालेल्या या हल्ल्यात इराणच्या उत्तरेकडील ताफ्यातील अनेक युद्धनौका, क्षेपणास्त्र नौका आणि पायाभूत सुविधांचे मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये इराणची आधुनिक युद्धनौका 'IRIS Deylaman' ला देखील लक्ष्य करण्यात आल्याचे वृत्त आहे.

 रशिया-इराण शस्त्र साखळीवर प्रहार 
कॅस्पियन समुद्र हा रशिया आणि इराणमधील व्यापारासाठी सर्वात सुरक्षित मार्ग मानला जात होता. येथूनच इराण रशियाला 'शाहेद ड्रोन' आणि इतर दारुगोळा पुरवत असे, ज्याचा वापर रशिया युक्रेन युद्धात करत आहे. इस्त्रायलने या मार्गाला लक्ष्य करून रशियाचा लष्करी पुरवठा रोखण्याचा प्रयत्न केला आहे. हा मार्ग केवळ लष्करीच नव्हे तर 'इंटरनॅशनल नॉर्थ-साउथ ट्रान्सपोर्ट कॉरिडॉर' चा देखील महत्त्वाचा भाग आहे.

युद्धाची व्याप्ती वाढली 
आतापर्यंत हे युद्ध केवळ पर्शियन आखात आणि होरमुझच्या सामुद्रधुनीपुरते मर्यादित होते. मात्र, कॅस्पियन समुद्रात हल्ला करून इस्त्रायलने संदेश दिला आहे की, इराणच्या कोणत्याही कोपऱ्यात हल्ला करण्याची त्यांची क्षमता आहे. इस्त्रायलच्या या 'ऑपरेशन रोअरिंग लायन' मुळे रशियाने तीव्र चिंता व्यक्त केली असून, यामुळे कॅस्पियन प्रदेशातील इतर देशही युद्धाच्या खाईत लोटले जाण्याची भीती व्यक्त केली आहे.

रशियाची प्रतिक्रिया रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने या हल्ल्याचा निषेध केला असून, याला 'बेजबाबदार' कृत्य म्हटले आहे. रशियानुसार, या हल्ल्यामुळे केवळ इराणचेच नव्हे तर रशियाच्या आर्थिक हितांचेही नुकसान झाले आहे.

Web Title : इज़राइल का ईरान पर हमला, कैस्पियन सागर में रूस-ईरान हथियार आपूर्ति मार्ग लक्षित

Web Summary : इज़राइल ने कैस्पियन सागर में एक प्रमुख ईरानी बंदरगाह पर हमला किया, जिससे रूस-ईरान हथियार आपूर्ति लाइनें नष्ट हो गईं। 'बंदर अंजली' बंदरगाह पर हमले में ईरानी नौसेना के जहाजों और बुनियादी ढांचे को नुकसान पहुंचा, जिससे रूस की सैन्य आपूर्ति प्रभावित हुई और क्षेत्रीय तनाव बढ़ गया। रूस ने हमले की निंदा की है।

Web Title : Israel Strikes Iran, Targets Russia-Iran Arms Supply Route in Caspian Sea

Web Summary : Israel reportedly struck a key Iranian port in the Caspian Sea, destroying vital Russia-Iran arms supply lines. The attack, targeting the 'Bandar Anzali' port, damaged Iranian naval assets and infrastructure, impacting Russia's military logistics and escalating regional tensions. Russia has condemned the strike.