"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2025 16:43 IST2025-06-21T16:42:25+5:302025-06-21T16:43:06+5:30

Israel-Iran Conflict: इस्राइल आणि इराण दोन्हीही आपले मित्र असल्याने भारताने या युद्धात दोन्हीपैकी कुठल्याही देशाला पाठिंबा दिलेला नाही. मात्र असं असलं तरी केंद्रातील सरकारमधील भाजपाचा प्रमुख सहकारी असलेल्या जनता दल युनायटेड पक्षाने उघडपणे इराणला पाठिंबा दिला आहे.

Israel-Iran Conflict: "May Iran win, they will defeat Israel...", ruling BJP's ally at the Centre supports Iran | "इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   

"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   

गेल्या नऊ दिवसांपासून मध्य-पूर्वेमध्ये इस्राइल आणि इराणमध्ये भयंकर संघर्ष सुरू आहे. या संघर्षामध्ये भाजपाच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने संयमी भूमिका घेतली आहे. इस्राइल आणि इराण दोन्हीही आपले मित्र असल्याने भारताने या युद्धात दोन्हीपैकी कुठल्याही देशाला पाठिंबा दिलेला नाही. मात्र असं असलं तरी केंद्रातील सरकारमधील भाजपाचा प्रमुख सहकारी असलेल्या जनता दल युनायटेड पक्षाने उघडपणे इराणला पाठिंबा दिला आहे. जेडीयूचे ज्येष्ठ नेते के.सी. त्यागी यांनी इराणला उघड पाठिंबा जाहीर केला आहे. तसेच इस्राइलच्या विस्तारवादी भूमिकेवर टीका केली आहे. त्याबरोबरच या युद्धात इराणचा विजय व्हावा, अशी सदिच्छाही त्यागी यांनी व्यक्त केली आहे.

इराण आणि इस्राइलच्या संघर्षाबाबत प्रसारमाध्यमांशी बोलताना के.सी. त्यागी म्हणाले की, इस्राइल आणि इराण यांच्यातील संघर्षाबाबत भारत सरकारची प्रतिक्रिया ही योग्य आणि योग्य वेळी आलेली आहे. मात्र एक राजकीय कार्यकर्ता म्हणून मी इस्राइलचा निषेध करतो.  गाझा असो वा इराण इस्राइलचा विस्तारवाद हा मध्य-पूर्वेतील अशांततेचं  मोठं कारण आहे. इस्राइल आता अमेरिकेचंही ऐकत नाही.

के.सी. त्यागी पुढे म्हणाले की, इराण हा नेहमीच भारतासोबत उभा राहत आला आहे. तसेच हा संघर्ष कोणत्याही परिस्थितीत अणुयुद्धापर्यंत पोहोचता कामा नये, याची काळजी घेतली गेली पाहिजे. जर शांततापूर्ण करार झाला, तर त्याचं आम्ही स्वागत करू. या संघर्षात इराणणने योग्य प्रतिक्रिया दिली आहे. तसेच तिचे मी स्वागत करतो, असेही त्यागी यांनी सांगितले.  

Web Title: Israel-Iran Conflict: "May Iran win, they will defeat Israel...", ruling BJP's ally at the Centre supports Iran