दुबईच्या हॉटेलमध्ये लाईव्ह स्ट्रीमिंग सुरू असतानाच कोसळलं मिसाईल; धडकी भरवणारा Video
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2026 15:09 IST2026-03-03T15:08:51+5:302026-03-03T15:09:49+5:30
एक महिला हॉटेलच्या खोलीत बसून लाईव्ह स्ट्रीमिंग करत असतानाच मिसाईल अटॅक झाला.

दुबईच्या हॉटेलमध्ये लाईव्ह स्ट्रीमिंग सुरू असतानाच कोसळलं मिसाईल; धडकी भरवणारा Video
युद्धामुळे प्रचंड तणावाचं वातावरण आहे. याच दरम्यान एका घटनेने सर्वसामान्यांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. दुबईतून समोर आलेल्या एका घटनेने सोशल मीडिया युजर्सना हादरवून सोडलं आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओनुसार एक महिला हॉटेलच्या खोलीत बसून लाईव्ह स्ट्रीमिंग करत असतानाच मिसाईल अटॅक झाला.
व्हिडिओमध्ये दिसतं की, ही महिला आपल्या प्रेक्षकांशी संवाद साधत होती आणि सर्व काही सामान्य वाटत होतं. मात्र अचानक एक मोठा स्फोट झाला. दावा केला जात आहे की, ज्या इमारतीत महिला होती, तिथे अचानक मिसाईल कोसळलं. हा स्फोट इतका भीषण होता की इमारतीचं मोठं नुकसान झालं. सोशल मीडियावर असाही दावा केला जात आहे की, यामध्ये महिलेचा जागीच मृत्यू झाला.
X (पूर्वीचे ट्विटर) वर @Sheetal2242 नावाच्या अकाउंटवरून शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये महिला कॅमेऱ्यासमोर बोलताना दिसते. अचानक मोठा आवाज होतो, कॅमेरा हलायला लागतो आणि सर्वत्र धुराचे लोट दिसतात. या व्हिडिओला लाखो व्ह्यूज मिळाले असून हजारो लोकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. युद्धामुळे निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागत असल्याबद्दल नेटीझन्सनी तीव्र संताप आणि दुःख व्यक्त केलं आहे.
दुबई में एक महिला अपने रूम में बैठकर लाइव स्ट्रीमिंग कर रही थी।
— Dr. Sheetal yadav (@Sheetal2242) March 2, 2026
तभी एक ईरानी मिसाइल उसी बिल्डिंग से जा टकराई जिसमें वो थी — जिससे उसकी मौत हो गई।
यह युद्ध बहुत से मासूमों की जान ले रहा है।#Iran#IranWar#Israelpic.twitter.com/FDeF7XWmmJ