आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 15:29 IST2025-06-12T15:29:08+5:302025-06-12T15:29:29+5:30

महत्वाचे म्हणजे, अमेरिकेने आपल्या दूतावासांमधून राजदूतांना परत बोलावले आहे, यामुळे सर्व काही सामान्य नाही. याशिवाय, ट्रॅव्हल अॅडव्हायजरीही जारी करण्यात आली आहे.

israel could attack on iran America vacates its embassies in 3 countries Why has there been so much fear | आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?

आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?

गाझा युद्धानंतरइस्रायल आणखी एका देशावर मोठा हल्ला करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. असे झाल्यास, जगात आणखी एका मोठ्या युद्धाला तोंड फुटेल. अमेरिकन वृत्तपत्र न्यू यॉर्क टाईम्सच्या वृत्तानुसार, इस्रायल कुठल्याही क्षणी इराणवर मोठा हल्ला करू शकतो. महत्वाचे म्हणजे, सर्वसाधारणपणे अमेरिकेच्या मदतीने लष्करी कारवाया करणारा इस्रायल, यावेळी त्याच्याशिवाय हा हल्ला करू शकतो. पण असे झाल्यास मध्य पूर्वेत तणाव वाढू शकतो. खरे तर, इराणसोबत अणु करारासाठी डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. अशा परिस्थितीत, जर इस्रायलने इराणवर हल्ला केला, तर परिस्थिती सुधारण्याऐवजी अधिक बिघडू शकते.

अमेरिकेने मध्य पूर्वेतील इराक, बहरीन आणि कुवेत या तीन देशांमधील आपल्या राजदूतांना परत बोलावण्यास सुरुवात केली असून हा चिंता वाढवणारा विषय आहे. खरे तर, इस्रायलच्या हल्ल्याच्या भीतीनेच अमेरिकेने आपले राजदूतांना परत बोलावले आहे. जर इस्रालने हल्ला केला, तर इराणही शांत बसणार नाही, तोही प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न करेल. मात्र, इस्रायलचा नेमका प्लॅन काय यासंदर्भात अद्याप कसलीही माहिती समोर आलेली नाही. मात्र बेंजामिन नेतन्याहू मागे हटण्यास तयार नाहीत, असे बोलले जात आहे. 

ट्रम्प फोनवरून बोलले, पण नेतन्याहू ठाम -
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतीच नेतन्याहू यांच्यासोबत फोनवरून दीर्घ चर्चा केली. माध्यमांनी सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेची इराणसोबत अण्वस्त्र करार करण्याची इच्छा आहे. यामुळे इराणवर हल्ला करू नये, असे डोनाल्ड ट्रम यांनी नेतन्याहू यांच्या सोबत होलताना म्हटले आहे. मात्र आपण कोणत्याही परिस्थितीत इराणला युरेनियमचा साठा वाढवू देणार नाही, ज्यातून अण्वस्त्रे बनवता येतील, असे इस्रायलचे म्हणणे आहे. 

महत्वाचे म्हणजे, अमेरिकेने आपल्या दूतावासांमधून राजदूतांना परत बोलावले आहे, यामुळे सर्व काही सामान्य नाही. याशिवाय, ट्रॅव्हल अॅडव्हायजरीही जारी करण्यात आली आहे.


 

Web Title: israel could attack on iran America vacates its embassies in 3 countries Why has there been so much fear

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.