७२ तासांच्या युद्धात भीषण विध्वंस! ४०६ इराणींचा मृत्यू, इस्रायलचे किती नुकसान? जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2025 13:53 IST2025-06-16T13:51:55+5:302025-06-16T13:53:20+5:30

Israel Attacks Iran: इस्रायल-इराण युद्ध सुरू होऊन ७२ तास उलटले आहेत. या काळात दोन्ही बाजूने एकमेकांवर जोरदार हल्ले सुरू आहेत.

Israel Attacks Iran: Horrific devastation in 72 hours of war! 406 Iranians killed, how much damage did Israel suffer? Find out... | ७२ तासांच्या युद्धात भीषण विध्वंस! ४०६ इराणींचा मृत्यू, इस्रायलचे किती नुकसान? जाणून घ्या...

७२ तासांच्या युद्धात भीषण विध्वंस! ४०६ इराणींचा मृत्यू, इस्रायलचे किती नुकसान? जाणून घ्या...

Israel Attacks Iran:इस्रायल-इराणयुद्ध सुरू होऊन ७२ तास उलटले आहेत. या काळात दोन्ही बाजूने एकमेकांवर जोरदार हल्ले सुरू आहेत. पण, या हल्ल्यांमध्ये इस्रायलपेक्षाइराणचे जास्त नुकसान झाले आहेत. या संघर्षात आतापर्यंत ४०६ इराणी नागरिक आणि सैनिक मृत्युमुखी पडले आहेत, तर ६५४ लोक जखमी झाले आहेत. तसेच, इराणी हल्ल्यात इस्रायलमधील १६ लोक मृत्युमुखी पडले असून, डझनभर जखमी झाले आहेत.

इस्रायलने बांधला हवाई कॉरिडॉर 
इस्रायलने दावा केला आहे की, त्यांनी तेहरानपर्यंत एक 'हवाई कॉरिडॉर' बांधला आहे, ज्याद्वारे ते आता कोणत्याही अडथळ्याशिवाय इराणवर हवाई हल्ले करू शकतात. या कॉरिडॉरचा वापर करून इस्रायली हवाई दलाने इराणच्या मशहाद विमानतळावर (२,३०० किलोमीटर अंतरावर) इंधन भरणाऱ्या विमानाला उद्ध्वस्त केले.

लष्करी आणि आण्विक तळांवर हल्ले
इस्रायलने, इराणच्या नान्टेस, इस्फहान आणि फोर्डो अणुस्थळांवर हल्ला केला आहे. या हल्ल्यांमुळे युरेनियम यंत्रांचे मोठे नुकसान झाले आहे. तेहरान आणि इतर शहरांमधील लष्करी तळ, क्षेपणास्त्र उत्पादन केंद्रे आणि रिफायनरीजना देखील लक्ष्य करण्यात आल्या. केरमानशाह आणि तबरीझमधील क्षेपणास्त्र तळही उद्ध्वस्त झाले आहेत, तर तेहरानच्या मेहराबाद विमानतळाचेही नुकसान झाले आहे.

उच्च लष्करी नेतृत्व आणि शास्त्रज्ञ ठार

इस्रायली हल्ल्यांमध्ये इराणचे उच्च लष्करी आणि गुप्तचर नेतृत्व जवळजवळ पूर्णपणे नष्ट झाले आहे. ठार झालेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये हे समाविष्ट आहे:

मेजर जनरल मोहम्मद बघेरी (लष्करप्रमुख)
मेजर जनरल हुसेन सलामी (IRGC कमांडर)
मेजर जनरल घोलम अली रशीद
जनरल अमीर अली हाजीजादेह
जनरल घोलमरेझा मेहराबी
जनरल मेहदी रब्बानी
ब्रिगेडियर जनरल मोहम्मद काझेमी आणि जनरल हसन मोहकिक (IRGC गुप्तचर प्रमुख आणि उप)
अली शामखानी (सर्वोच्च नेत्याचे सल्लागार)

तसेच, इस्रायली हल्ल्यांमध्ये अनेक प्रमुख इराणी अणुशास्त्रज्ञ ठार झाले आहेत, ज्यात मोहम्मद मेहदी तेहरानची, फेरेदून अब्बासी-दवानी, अब्दुलहमीद मिनोचेहर, अहमदरेझा झोलफाघारी, अमीरहोसेन फकी, अली बकाई करीमी, मन्सूर असगारी आणि सईद बोरजी यांचा समावेश आहे.

इराणचे प्रत्युत्तर
इराणने इस्रायलवर १००-२०० बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे आणि ड्रोन डागून प्रत्युत्तर दिले. यापैकी काही आयर्न डोमला चुकवण्यात यशस्वी आले. इराणने प्रामुख्याने तेल अवीव, रमत गान, बट याम आणि रेहोवोटला लक्ष्य केले.

इस्रायलने राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली
इराणी हल्ल्यांनंतर इस्रायलने राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली आहे. तेल अवीव, जेरुसलेम आणि हैफामध्ये हवाई हल्ल्यांचे सायरन वाजू लागले, ज्यामुळे लाखो लोकांना बंकरमध्ये आश्रय घ्यावा लागला. परिस्थिती अजूनही तणावपूर्ण आहे.

Web Title: Israel Attacks Iran: Horrific devastation in 72 hours of war! 406 Iranians killed, how much damage did Israel suffer? Find out...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.