Israel attack Yemen: इस्रायलचा येमेनवर मोठा हवाई हल्ला, राजधानी सना हादरली, हुथी बंडखोरांच्या हल्ल्यानंतर पलटवार
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2025 09:20 IST2025-09-26T09:18:57+5:302025-09-26T09:20:33+5:30
Israel Attack Yemen news: इस्रायलने येमेनची राजधानी सना शहराला लक्ष्य करत हल्ला केला. यात ९ जण मरण पावले आहेत, तर अनेकजण जखमी झाले आहेत.

Israel attack Yemen: इस्रायलचा येमेनवर मोठा हवाई हल्ला, राजधानी सना हादरली, हुथी बंडखोरांच्या हल्ल्यानंतर पलटवार
Israel attack yemen today: तेल अवीववर करण्यात आलेल्या ड्रोन हल्ल्याला इस्रायलने हल्ल्यातूनच उत्तर दिले. इस्रायलने येमेनची राजधानी सना शहरावर मोठा हल्ला केला. यात ९ लोक ठार झाले आहेत. तर अनेकजण जखमी झाले आहेत. इस्रायलने सना शहरातील येमेनच्या लष्करी ठिकाणे आणि पेट्रोल पंपावरच हल्ला चढवला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
हुथी बंडखोरांकडून इस्रायलच्या तेल अवीव आणि इतर काही शहरात ड्रोन हल्ले करण्यात आले. त्याला प्रत्युत्तर म्हणून इस्रायलने येमेनच्या राजधानीलाच लक्ष्य केले. हुथी बंडखोर सातत्याने ड्रोन हल्ले करत असल्याचा दावा इस्रायलकडून करण्यात आला आहे.
इस्रायलचा सना शहरावर बॉम्ब वर्षाव
इस्रायलच्या लष्कराकडून सांगण्यात आले की, असंख्य विमानांनी येमेनची राजधानी सना शहरावर हवाई हल्ला चढवला. सना शहरातील हुथी बंडखोरांची ठिकाणे, गुप्तचर यंत्रणा आणि लष्कराशी संबंधित ठिकाणांवर बॉम्ब टाकण्यात आले.
येमेनमधील सत्ता हुथी बंडखोरांच्या ताब्यात असून, येमेनच्या आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की, इस्रायलने केलेला हल्ला क्रूर गुन्हा आहे. नागरी वस्त्या आणि इमारतींनाही हल्ला करताना लक्ष्य करण्यात आले. यात ९ लोकांचा मृत्यू झाला आहे.
हुथी बंडखोरांनी बुधवारी इस्रायलवर ड्रोन हल्ला केला होता. इस्रायलच्या रेड सी रिसॉर्ट इलातमध्ये केलेल्या हल्ल्यात २२ लोक जखमी झाले होते. त्यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे.
हुथी बंडखोरांनी इस्रायलच्या दिशेने ड्रोन सोडले, तसेच मिसाईलही डागल्या. त्या पाडण्यासाठी इस्रायलने हवाई हल्ले केले. हुथी बंडखोरांच्या ताब्यात असलेल्या अल मसिरा या वृत्तवाहिनीने म्हटले आहे की, लष्कराच्या मुख्यालय असलेल्या इमारतीवरच हल्ला करण्यात आला. मध्य सना शहरातील हे मुख्यालय आहे.