मोठी बातमी! इस्रायलच्या हल्ल्यात इराणच्या संरक्षण मंत्र्यांचा मृत्यू; अबुधाबी, दुबईसह ९ देशांवर इराणचे हल्ले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2026 23:33 IST2026-02-28T23:32:36+5:302026-02-28T23:33:37+5:30

Israel America Vs Iran War latest news: इस्रायल आणि अमेरिकेने इराणवर मोठा हल्ला केला असून ८५ विद्यार्थिनींचा मृत्यू झाला आहे. इराणने प्रत्युत्तरात ४०० क्षेपणास्त्रे डागत दुबई आणि अमेरिकन तळांना लक्ष्य केले. सविस्तर वाचा.

Israel America Vs Iran War latest news: Big news! Iranian Defense Minister killed in Israeli attack; Iran attacks 9 countries including Abu Dhabi, Dubai | मोठी बातमी! इस्रायलच्या हल्ल्यात इराणच्या संरक्षण मंत्र्यांचा मृत्यू; अबुधाबी, दुबईसह ९ देशांवर इराणचे हल्ले 

मोठी बातमी! इस्रायलच्या हल्ल्यात इराणच्या संरक्षण मंत्र्यांचा मृत्यू; अबुधाबी, दुबईसह ९ देशांवर इराणचे हल्ले 

तेहरान/तेल अवीव: पश्चिम आशियात आज युद्धाचा भडका उडाला असून इस्रायल आणि अमेरिकेने संयुक्तपणे इराणच्या १० शहरांवर मोठा हवाई हल्ला केला आहे. या भीषण हल्ल्यात दक्षिण इराणमधील एका शाळेवर क्षेपणास्त्र पडल्याने ८५ शाळकरी मुलींचा मृत्यू झाला असून ४५ जणी गंभीर जखमी आहेत. या युद्धामुळे संपूर्ण जगात खळबळ उडाली आहे. इस्रायलच्या या हल्ल्यात इराणचे संरक्षण मंत्री अमीर नासिरजादेह आणि रिव्होल्युशनरी गार्ड्स (IRGC) चे कमांडर मोहम्मद पाकपोर यांचा मृत्यू झाला आहे.

न्यूज एजन्सी रॉयटर्सने दिलेल्या दाव्यानुसार, इस्रायलच्या या हल्ल्यात इराणचे संरक्षण मंत्री अमीर नासिरजादेह आणि रिव्होल्युशनरी गार्ड्स (IRGC) चे कमांडर मोहम्मद पाकपोर यांचा मृत्यू झाला आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक व्हिडिओ जारी करत म्हटले आहे की, "अमेरिकन नागरिकांच्या रक्षणासाठी आणि इराणचा अण्वस्त्र धोका संपवण्यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे."

इराणचा महा-पलटवार
या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इराणने इस्रायलवर ४०० हून अधिक क्षेपणास्त्रे डागली आहेत. इतकेच नाही तर इराणने कतार, कुवेत, जॉर्डन, बहरीन, सौदी अरेबिया आणि यूएईमधील अमेरिकन लष्करी तळांना लक्ष्य केले आहे. 

दुबईवरही हल्ला
इराणने प्रथमच यूएईचे सर्वात मोठे शहर दुबई आणि अबू धाबीवरही क्षेपणास्त्रे डागली असून तेथे मोठ्या स्फोटांचे आवाज ऐकू आले आहेत. या युद्धामुळे जागतिक स्तरावर चिंतेचे वातावरण असून कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Web Title : इज़राइल के हमले में ईरानी रक्षा मंत्री की मौत; ईरान का पलटवार।

Web Summary : इज़राइल और अमेरिका के हवाई हमलों में ईरानी अधिकारियों की मौत। ईरान ने इज़राइल और दुबई सहित कई देशों में अमेरिकी ठिकानों पर मिसाइलों से जवाबी हमला किया। वैश्विक चिंताएँ बढ़ीं।

Web Title : Iran Defense Minister Killed in Israeli Strike; Iran Retaliates.

Web Summary : Israel and US airstrikes hit Iran, killing officials. Iran retaliated with missiles on Israel and US bases in multiple countries, including Dubai. Global concerns rise.