नेपाळमध्ये ISI उभं करतंय नेटवर्क, 'बांगलादेशी मॉडेल'चा वापर; 'असा' रचला जातोय भारताविरोधी कट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2025 08:26 IST2025-07-30T08:25:46+5:302025-07-30T08:26:21+5:30

ASH फाऊंडेशन २०१८ पासून सक्रीय आहे  आणि त्याची नोंदणी बांगलादेशात एक सामाजिक संस्था म्हणून करण्यात आली.

ISI is setting up a network in Nepal, using 'Bangladeshi model'; 'This' is how anti-India conspiracy is being hatched | नेपाळमध्ये ISI उभं करतंय नेटवर्क, 'बांगलादेशी मॉडेल'चा वापर; 'असा' रचला जातोय भारताविरोधी कट

नेपाळमध्ये ISI उभं करतंय नेटवर्क, 'बांगलादेशी मॉडेल'चा वापर; 'असा' रचला जातोय भारताविरोधी कट

पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा ISI आता नेपाळलाभारताविरोधात वापरण्याचा कट रचत आहे. बांगलादेशात आपली पकड मजबूत केल्यानंतर ISI नेपाळमध्ये कट्टरपंथी नेटवर्क उभं करण्याचा प्रयत्न करत आहे. आयएसआयच्या मदतीने नेपाळच्या सुनसरी जिल्ह्यात रज्जाक मस्जिद नावाने एक नवीन धार्मिक स्थळ तयार केले जात आहे. या मशि‍दीच्या बांधकामाचा पाया १८ जुलैला अलहाज शम्सुल हक फाऊंडेशनने ठेवला आहे.

फाऊंडेशनचे अध्यक्ष इंजिनिअर मोहम्मद नासिर उद्दीन यांनी या मशि‍दीला इस्लाम जागरण केंद्र म्हटले आहे. नेपाळमध्ये ९५ टक्के गैर मुस्लीम लोकसंख्येपर्यंत इस्लामचा प्रचार करणे हा त्यामागचा हेतू आहे असं त्यांनी सांगितले. मात्र ही मशीद केवळ एक धार्मिक स्थळ नाही तर ISI साठी एक लॉजिस्टिक आणि नेटवर्किंग हब बनू शकतो असा संशय भारतीय यंत्रणांना आहे. विशेष म्हणजे या प्रोजेक्टला काही आखाती देश आणि तुर्किस्तानकडूनही समर्थन मिळत आहे. 

नेपाळमध्ये पाकिस्तानचं बांगलादेशी मॉडेल

ASH फाऊंडेशन २०१८ पासून सक्रीय आहे  आणि त्याची नोंदणी बांगलादेशात एक सामाजिक संस्था म्हणून करण्यात आली. परंतु बांगलादेशात शेख हसीना सरकार गेल्यानंतर जमात ए इस्लामी समर्थक मोहम्मद युनूस अंतरिम सरकार आल्यापासून या संस्थेला आयएसआयकडून अधिकची सूट मिळाली आहे. आता हेच मॉडेल नेपाळमध्ये आणले जात आहे. मागील काही वर्षात ISI नेपाळला ना केवळ भारताविरोधी षडयंत्रासाठी वापर करत आहे तर नेपाळची लोकसंख्या आणि सांस्कृतिक संरचनेतही बदल करण्याचा प्रयत्न करत आहे.

दरम्यान, नेपाळ एक हिंदू बहुल देश आहे. याठिकाणी धार्मिक कट्टरता आणि दहशतवाद यासारख्या घटना पाहायला मिळाल्या नाहीत. परंतु येणाऱ्या काळात आयएसआय आणि त्यांच्याशी निगडीत संघटना यांच्या मदतीने नेपाळला नवीन कट्टरपंथी ठिकाण बनवले जात आहे असं भारतीय यंत्रणांना वाटते. आयएसआय नेपाळमध्ये तोच प्रयोग करत आहे जो त्यांनी बांगलादेश, पूर्वोत्तर भारत आणि पश्चिम बंगालमध्ये केला आहे. धार्मिक स्थळाच्या आडून कट्टरपंथी विचार पसरवणे, लोकसंख्येचे समीकरण बदलणे आणि भविष्यात भारताविरोधात मोर्चा उघडणे असं एका अधिकाऱ्याने सांगितले. 

चिंतेचा विषय का?

सूत्रांनुसार, अल कायदासारख्या दहशतवादी संघटनांनी २०२३ मध्ये नेपाळमध्ये ट्रेनिंग कॅम्प बनवण्याचा प्रयत्न केला होता. आता ASH फाऊंडेशनसारख्या संघटनेच्या माध्यमातून इस्लामिक सेंटर, मदरसे आणि मशिदी बनवून नेपाळला कट्टरपंथी नेटवर्क उभं करण्याचा प्रयत्न होत असल्याचे समोर आले आहे. 

Web Title: ISI is setting up a network in Nepal, using 'Bangladeshi model'; 'This' is how anti-India conspiracy is being hatched

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.