इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2026 10:53 IST2026-04-05T10:51:03+5:302026-04-05T10:53:06+5:30

नुकत्याच समोर आलेल्या आकडेवारीनुसार, ट्रम्प यांची लोकप्रियता ३६ टक्क्यांपर्यंत खाली आली आहे. ही त्यांच्या कार्यकाळातील सर्वात नीचांकी पातळी आहे...

Is Trump's own position in danger as he seeks to regime change in Iran Public opposition popularity plummets | इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला

इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला

इराणमध्ये सत्तापालट करण्यासाठी निघालेल्या अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरच देशांतर्गत राजकीय दबाव वाढताना दिसत आहे. इराणसोबत सुरू असलेल्या युद्धामुळे अमेरिकेतील इंधनाचे दर आणि महागाई गगनाला भिडले आहेत. ट्रम्प प्रशासनाबद्दल जनतेच्या मनातील असंतोष बाहेर येतानाही दिसत आहे. नुकत्याच समोर आलेल्या आकडेवारीनुसार, ट्रम्प यांची लोकप्रियता ३६ टक्क्यांपर्यंत खाली आली आहे. ही त्यांच्या कार्यकाळातील सर्वात नीचांकी पातळी आहे.

अटर्नी जनरल पाम बाँडी यांना नुकतेच पदावरून हटवल्यानंतर, व्हाईट हाऊसमध्ये मोठ्या फेरबदलाची चर्चा सुरू झाली आहे. खरेतर, इराणसोबत सुरू असलेल्या युद्धामुळे ट्रम्प यांच्यावर राजकीय आणि लोकप्रिय स्तरावर परिणाम होत असल्याने, ते आपल्या मंत्रिमंडळात बदल करण्याचा गंभीरपणे विचार करत असल्याचे वृत्त आहे.

मोठ्या पदांवर टांगती तलवार - 
मिळालेल्या माहितीनुसार, नॅशनल इंटेलिजन्स डायरेक्टर तुलसी गॅबार्ड आणि कॉमर्स सेक्रेटरी हॉवर्ड लुटनिक यांच्या पदांवरही तलवार लटकत आहे. ट्रम्प गॅबार्ड यांच्या कामावर आधापासूनच नाराज आहेत आणि त्यांच्या जागी पर्यायांवर विचार करत आहेत, असे समजते. तर लुटनिक यांच्या जुन्या संबंधांसंदर्भातही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. मात्र, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचा आपल्या टीमवर पूर्ण विश्वास असल्याचे व्हाइट हाउसकडून सांगण्यात येत आहे. 

टार्गेटेड बदलाची तयारी -
महत्वाचे म्हणजे, खुद्द ट्रम्प यांनाच मोठे बदल टाळायचे आहेत. मात्र, परिस्थिती हाताळण्यासाठी ते काही 'टार्गेटेड बदल' करण्याच्या तयारीत आहेत, जेणेकरून मोठा झटकाही बसणार नाही आणि जनतेत सरकार सक्रीय असल्याचा संदेशही जाईल.

'ते' भाषणही जनतेचा विश्वास संपादन करण्यात अपयशी -
इराण युद्धाला सुमारे पाच आठवड्यांहूनही अधिक काळ लोटला आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, सुमारे ६० टक्के अमेरिकन जनता या युद्धाच्या विरोधात आहे. इंधनाच्या वाढत्या किमती आणि युद्ध लांबण्याची भीती यांमुळे ट्रम्प समर्थकांमध्येही अस्वस्थता आहे. दरम्यान, ट्रम्प यांनी नुकतेच देशाला उद्देशून भाषण दिले. मात्र, ते भाषणही जनतेचा विश्वास संपादन करण्यात अपयशी ठरल्याचे अधिकारीच मान्य करत आहेत. 

दरम्यान, आता स्वतःची प्रतिमा सुधारण्यासाठी ट्रम्प माध्यमांवर खापर फोडताना दिसत आहेत. सरकार सक्रिय असल्याचे दाखवण्यासाठी आगामी काळात व्हाईट हाऊसमध्ये अजून काही बड्या अधिकाऱ्यांची गच्छंती होण्याची मोठी शक्यता वर्तवली जात आहे. 

 

Web Title : ईरान पर ट्रंप की पकड़ कमजोर: क्या कुर्सी खतरे में, लोकप्रियता घटी?

Web Summary : ईरान नीति पर ट्रंप को झटका, अमेरिकी ईंधन महंगा। लोकप्रियता 36% तक गिरी। जनता के असंतोष और युद्ध से थकान के बीच मंत्रिमंडल में फेरबदल की संभावना। सरकार सक्रिय दिखाने के लिए बदलाव संभव।

Web Title : Trump's Iran Stance Backfires: Approval Dips, Cabinet Shake-Up Looms?

Web Summary : Trump's Iran policy faces backlash as US fuel prices soar. His approval rating plummeted to 36%. Cabinet reshuffle considered amid public discontent and war fatigue. Key officials may be replaced to project government action.