इराणसोबतयुद्ध सुरू असताना रविवारी (२९ मार्च) सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले गेले. हे फोटो होते सौदी अरेबियातील प्रिन्स सुलतान हवाई तळावरील. अमेरिकेचे हे सौदी अरेबियातील लष्करी तळ असून, त्यावरच इराणने हवाई हल्ला केला. जे फोटो व्हायरल झाले, ते खरे आहेत. याबद्दल बीबीसीनेही सॅटेलाईट फोटो आणि तळावरील हल्ल्याचे फोटो, याचा एक रिपोर्ट प्रसिद्ध केला असून, त्याबद्दलची स्फोटक माहिती उघड केली गेली आहे.
राजधानी रियाधपासून १०० किमी अंतरावर दक्षिण-पूर्वेला प्रिन्स सुलतान हवाई तळ आहे. त्याचेच फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. सॅटेलाईट फोटोमध्ये खांब, स्टोरेज यूनिट आणि इमारतींवरील हल्ल्यांच्या खुणा फोटोंसोबत जुळून आल्या आहेत.
दोन रिफ्युलिंग विमाने उद्ध्वस्त
द वॉल स्ट्रीट जर्नलने रिपोर्टमध्ये म्हटले होते की, हवेतच दुसऱ्या विमानांमध्ये इंधन भरणारी दोन विमाने या हल्ल्यात उडवली गेली. ज्यात त्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.
इराणने केलेल्या याच हल्ल्यात अमेरिकेचे १२ जवान जखमी झाले आहेत. त्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे काही रिपोर्ट्समध्ये म्हटले गेले आहेत. रविवारी (२९ मार्च) इराणच्या इस्लामिक रिव्हॉल्युशनरी गार्ड कॉर्प्सशी संबंधित फार्स वृत्त संस्थेने दावा केला होता की, इराणच्या शाहेद या ड्रोन हल्ल्यात तीन विमानांना लक्ष्य करण्यात आले होते.
सॅटेलाइट फोटोंमध्ये काय दिसले?
रिपोर्टनुसार ११ मार्च रोजी टिपण्यात आलेल्या सॅटेलाईट फोटोमध्ये हल्ला झालेल्या ठिकाणी एक ई-३ विमान उभे असल्याचे दिसत आहे. पण, छोटोतून हे स्पष्ट झालेलं नाही की, हल्ल्यात उद्ध्वस्त झालेलं विमान तेच आहे.
विमानांना ट्रॅक करणाऱ्या फ्लाइटरडार२४ च्या तपासानुसार हे विमान १८ मार्च रोजी लष्करी तळाच्या परिसरातच उड्डाण करताना दिसले होते. शुक्रवारी घेतलेल्या सॅटेलाइट फोटोंमध्ये तळाच्या विमाने उभी केलेल्या भागात आग आणि धुराचे लोट दिसत आहेत.