"...तर आम्ही अमेरिकन नौदलाला समुद्रात बुडवू" ट्रम्प यांच्या आव्हानाला इराणचे जशास तसे उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2026 10:18 IST2026-02-18T10:15:50+5:302026-02-18T10:18:23+5:30

Ayatollah Khamenei: मध्य पूर्वेतील तणाव आता शिगेला पोहोचला आहे. अमेरिकेने गेल्या २४ तासांत ५० हून अधिक अत्याधुनिक एफ-२२, एफ-३५ आणि एफ-१६ लढाऊ विमाने इराणच्या दिशेने रवाना केली आहेत. पण इराणनेही मागे हटण्यास नकार दिला आहे.

Iran's response to Trump's warning; Khamenei's post causes uproar in US Navy | "...तर आम्ही अमेरिकन नौदलाला समुद्रात बुडवू" ट्रम्प यांच्या आव्हानाला इराणचे जशास तसे उत्तर

"...तर आम्ही अमेरिकन नौदलाला समुद्रात बुडवू" ट्रम्प यांच्या आव्हानाला इराणचे जशास तसे उत्तर

इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव शिगेला पोहोचला असून इराणचे नेते अयातुल्ला अली खामेनी यांनी अमेरिकन नौदलाचा विनाश करण्याची क्षमता आपल्याकडे असल्याचा इशारा दिल्याने युद्धाचे ढग गडद झाले आहेत. दुसरीकडे, अमेरिकेने गेल्या २४ तासांत ५० हून अधिक आधुनिक लढाऊ विमाने मध्य पूर्वेच्या दिशेने रवाना केली आहेत.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!

लष्करी विमान वाहतूक मॉनिटर्स आणि फ्लाइट-ट्रॅकिंग डेटानुसार, अमेरिकेने अचानक आपली लष्करी ताकद वाढवली आहे, यामध्ये एफ- २२, एफ-३५ आणि एफ-१६ सारखी अत्याधुनिक लढाऊ विमाने मध्य पूर्वेकडे पाठवण्यात आली आहेत. विशेष म्हणजे, या विमानांसोबत हवाई इंधन भरणारे टँकर्सही पाठवण्यात आले आहेत, जे अमेरिकन सैन्य दीर्घकालीन लष्करी कारवाईच्या तयारीत असल्याचे संकेत देत आहेत.

राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी मध्य पूर्वेत युद्धनौका पाठवल्याची घोषणा केल्यानंतर, इराणचे नेते अयातुल्ला अली खामेनी यांनी सोशल मीडियावर एक वादग्रस्त फोटो पोस्ट केला. या फोटोमध्ये अमेरिकेची सर्वात मोठी विमानवाहू युद्धनौका यूएसएस जेराल्ड आर फोर्ड पाण्याखाली बुडवलेली दाखवण्यात आली असून त्याच्याबाजूला एक कबर दिसत आहे."युद्धनौका नक्कीच धोकादायक आहे, पण त्यापेक्षाही धोकादायक म्हणजे ती युद्धनौका बुडवण्याची क्षमता असलेले आमचे शस्त्र!", असेही त्यांनी म्हटले आहे. 

एकीकडे युद्धाची भाषा सुरू असताना, ओमानच्या मध्यस्थीने जिनिव्हामध्ये दोन्ही देशांदरम्यान अणुकार्यक्रमाबाबत चर्चेचा दुसरा टप्पा पार पडला. इराणी परराष्ट्रमंत्र्यांनी ही चर्चा सकारात्मक असल्याचे म्हटले असून काही मुद्द्यांवर सहमती झाल्याचे सांगितले. अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स यांनी स्पष्ट केले की, जरी काही मुद्द्यांवर करार झाला असला, तरी इराण राष्ट्राध्यक्षांनी आखलेल्या रेड लाइन ओलांडण्याचा प्रयत्न करत आहे, जे अमेरिका कदापि मान्य करणार नाही.

दरम्यान, दोन्ही देश एकमेकांच्या लष्करी हालचालींवर बारीक लक्ष ठेवून आहेत. इराणने दिलेली उघड धमकी आणि अमेरिकेची वाढती लष्करी उपस्थिती यामुळे हा तणाव जागतिक शांततेसाठी मोठा धोका निर्माण करू शकतो.

Web Title : ईरान की चेतावनी: अमेरिकी नौसेना को डुबो देंगे; तनाव बढ़ा

Web Summary : ईरान ने अमेरिकी युद्धपोतों को डुबोने की धमकी दी, तनाव बढ़ा। मध्य पूर्व में अमेरिकी सैन्य उपस्थिति बढ़ी। परमाणु वार्ता में कुछ प्रगति, मतभेद बरकरार, वैश्विक शांति चिंताजनक।

Web Title : Iran Warns: We'll Sink US Navy; Tensions Rise

Web Summary : Iran threatens to sink US warships amid heightened tensions and increased US military presence in the Middle East. Nuclear talks show some progress, but disagreements remain, raising concerns for global peace.