कतारच्या इशाऱ्याला इराणच्या वाकुल्या! कतारमधील अमेरिकेच्या लष्करी तळावर केला मिसाईल हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2026 13:55 IST2026-03-04T13:51:51+5:302026-03-04T13:55:29+5:30

Iran Attack on Qatar American Air Base: कतारच्या भूमीवर असलेल्या अमेरिकेच्या लष्करी तळांवर इराणचे हल्ले सुरूच आहेत. कतारने इराणला आम्ही उत्तर देऊ असा इशारा दिला असतानाच इराणने पुन्हा मिसाईल डागल्या. 

Iran's response to Qatar's warning! Missile attack on US military base in Qatar | कतारच्या इशाऱ्याला इराणच्या वाकुल्या! कतारमधील अमेरिकेच्या लष्करी तळावर केला मिसाईल हल्ला

कतारच्या इशाऱ्याला इराणच्या वाकुल्या! कतारमधील अमेरिकेच्या लष्करी तळावर केला मिसाईल हल्ला

"आम्ही स्पष्टपणे हे सांगू इच्छितो की, अशा प्रकारच्या हल्ल्यांना उत्तर निश्चित दिले जाईल आणि ते दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही", असा इशारा कतारने दिल्यानंतर इराणने त्याला वाकुल्याच दाखवल्या. इराणने पुन्हा एकदा कतारमधील अमेरिकेच्या लष्करी ठिकाणांना लक्ष्य करत मिसाईल हल्ला केला. इराणने दोन मिसाईल डागल्या, त्यापैकी एक मिसाईल हवेतच निष्क्रिय करण्यात आली, तर दुसरी मिसाईल कतारमध्ये असलेल्या अमेरिकेच्या सर्वात मोठ्या लष्करी ठिकाणावर पडली. 

कतारच्या हद्दीत असलेल्या आणि आखातातील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या लष्करी ठिकाणांवर इराणने हल्ला केला. कतारकडून इशारा दिले गेलेला असतानाच इराणकडून ही कारवाई करण्यात आली. कतारच्या संरक्षण मंत्रालयाकडूनच ही माहिती देण्यात आली आहे. 

अमेरिकेच्या सर्वात मोठ्या लष्करी तळावर हल्ला

कतारच्या संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे की, कतारवर इराणकडून दोन मिसाईल डागण्यात आल्या. दोन्ही बॅलेस्टिक मिसाईल्स होत्या. त्यातील एक मिसाईल कतारच्या एअर डिफेन्स सिस्टिमने हवेतच भेदली. तर दुसरी मिसाईल उल उदेद एअर बेसवर पडली आहे. हा अमेरिकेचा या भागातील सर्वात मोठा लष्करी तळ आहे. 

इराणने केलेल्या मिसाईल हल्ल्यात कोणतीही जीवित हानी झाल्याची माहिती अद्याप नाही, अशी माहिती कतारने दिली आहे. अमेरिकेकडून मात्र यावर कोणतीही प्रतिक्रिया अद्याप देण्यात आलेली नाही. 

कतारने इराणच्या हल्ल्याबद्दल काय म्हटले आहे?

इराणकडून शेजारी देशात असलेल्या अमेरिकेच्या लष्करी तळांना लक्ष्य करत हल्ले केले जात असले, तरी काही रहिवाशी भागातही हल्ले झाले आहेत. इराणकडून होत असलेल्या हल्ल्याबद्दल कतारच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते माजिद अल अन्सारी म्हणाले की, "इराणकडून सर्व मर्यादा ओलांडल्या गेल्या आहेत. आमच्या इमारतींवर हल्ले होत आहेत. रहिवाशी भागात हल्ले होत आहे. या हल्ल्याचे परिणाम स्पष्टपणे दिसत आहेत."

"आमच्या नेतृत्वासमोर उत्तर देण्याचे सर्व पर्याय खुले आहेत. आम्ही हे स्पष्ट करू इच्छितो की, अशा प्रकारचे हल्ल्यांना निश्चितच उत्तर दिले जाईल. आम्हीही उत्तर दिल्याशिवाय शांत राहणार नाही", अशी भूमिका कतारने इराणच्या हल्ल्यांवर मांडलेली आहे. 

Web Title : क़तर की चेतावनी के बाद ईरान ने कतर में अमेरिकी अड्डे पर हमला किया

Web Summary : क़तर की चेतावनी के बावजूद ईरान ने कतर में अमेरिकी सैन्य अड्डे पर मिसाइल हमला किया। एक मिसाइल को हवा में ही नष्ट कर दिया गया, जबकि दूसरी अल उदेद एयर बेस पर गिरी। क़तर ने हमलों की निंदा की और जवाबी कार्रवाई की कसम खाई। कोई हताहत नहीं हुआ।

Web Title : Iran Attacks US Base in Qatar After Qatari Warning

Web Summary : Iran launched missile strikes on a US military base in Qatar, defying Qatari warnings. One missile was intercepted, while the other hit the Al Udeid Air Base. Qatar condemned the attacks, vowing a response. No casualties were reported.