"इराणचे नौदल, हवाई दल संपले; कारखाने उडवले, ४२ युद्धनौका बुडाल्या"; डोनाल्ड ट्रम्प काय बोलले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2026 15:44 IST2026-03-08T15:39:17+5:302026-03-08T15:44:10+5:30

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबत सुरू असलेल्या युद्धाबद्दल बोलताना इराणची ४२ जहाजे बुडाली असल्याचे म्हटले आहे. 

"Iran's navy, air force are gone; factories blown up, 42 warships sunk"; What did Donald Trump say? | "इराणचे नौदल, हवाई दल संपले; कारखाने उडवले, ४२ युद्धनौका बुडाल्या"; डोनाल्ड ट्रम्प काय बोलले?

"इराणचे नौदल, हवाई दल संपले; कारखाने उडवले, ४२ युद्धनौका बुडाल्या"; डोनाल्ड ट्रम्प काय बोलले?

इराणच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे प्रमुख अली लारीजानी यांनी केलेल्या विधानावर बोलताना अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचे नौदल संपले असल्याचे म्हटले आहे. ट्रम्प यांनी सांगितले की, "त्यांचे लष्करी कारखाने उडवले जात आहेत. त्यांचे नौदल संपले आहे. ६ दिवसांमध्ये इराणची ४२ युद्धनौका बुडाल्या आहेत."

इराणच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे अध्यक्ष अली लारीजानी यांनी म्हटले होते की, इराणवर करण्यात आलेल्या हल्ल्यांची किंमत अमेरिका आणि इस्रायला मोजावी लागेल. 

इराणचं सगळं काही संपलं आहे

लारीजानी यांच्या याच विधानावर सीबीएस वृत्तवाहिनीशी बोलताना डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, "ते कोणत्या गोष्टीबद्दल बोलत आहेत, हे मला माहिती नाही. ते कोण आहेत? मला याचा अजिबात फरक पडत नाही. ते आधीच पराभूत झाले आहेत."

"आम्ही जे काम केले आहे, ते खूपच भारी आहे. त्यांच्या पूर्ण मिसाईल्स नष्ट केल्या आहेत. दारूगोळा कारखाने उडवले जात आहेत. त्यांचे नौदल संपले आहे. मागील सहा दिवसातच त्यांची ४२ जहाज बुडाली आहेत. त्यांच्या सैन्याचा प्रत्येक भाग संपला आहे. त्यांचे नेतृत्वही संपले आहे. त्यांचं काहीच उरलेलं नाही, सगळं काही संपवलं आहे", असे डोनाल्ड ट्रम्प म्हणाले. 

शाळेवर हल्ला इराणनेच केला

"आम्ही अशा पद्धतीने आणि वेगाने जिंकत आहोत, जे यापूर्वी कधीही पाहिले गेलेले नाही", असे सांगतानाच ट्रम्प यांनी इराणमध्ये एका शाळेवर झालेल्या हवाई हल्ल्याबद्दलही मोठा दावा केला आहे. 

ट्रम्प म्हणाले की, "माझ्या मते आणि मी जे काही पाहिले, त्याआधारे हा हल्ला इराणनेच केला आहे. आम्हाला असे वाटत आहे की हा हल्ला इराणनेच केला आहे. तुम्हाला माहिती आहे की त्यांच्या मिसाईल्स अचूक नाहीत. त्यांच्यामध्ये अजिबातच अचूकता नाहीत."

ब्रिटनवरही भडकले ट्रम्प 

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ब्रिटनवरही भडकले. ब्रिटन जो कधी आमचा सर्वात चांगला सहकारी होता. कदाचित सर्वात महान, आता अखेरीस मध्य पूर्वेत दोन विमानवाहू युद्धनौका पाठवण्याबद्दल गांभीर्याने विचार करत आहे. हे ठीक आहे. आता पंतप्रधान स्टार्मर यांची आम्हाला गरज नाही. पण, आम्ही हे लक्षात ठेवू", असा इशारा ट्रम्प यांनी दिला. 

Web Title : ईरान की नौसेना, वायु सेना नष्ट: ट्रम्प का दावा, 42 युद्धपोत डूबे

Web Summary : ट्रम्प ने दावा किया कि ईरान की सेना तबाह हो गई है, नष्ट कारखानों और डूबी हुई नौसेना का हवाला दिया। उन्होंने ईरानी धमकियों को खारिज कर दिया, आरोप लगाया कि ईरान ने अपने ही स्कूल पर हमला किया और ब्रिटेन की मध्य पूर्व में भागीदारी की आलोचना की।

Web Title : Iran's Navy, Air Force Destroyed: Trump Claims 42 Warships Sunk

Web Summary : Trump claimed Iran's military is decimated, citing destroyed factories and a sunken navy. He dismissed Iranian threats, alleging Iran attacked its own school and criticized Britain's Middle East involvement.