इराणचा कुवेतच्या रिफायनरीवर भीषण हल्ला! कच्च्या तेलाचे दर १८० डॉलर्सवर जाण्याची भीती व्यक्त...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2026 12:10 IST2026-03-20T12:08:58+5:302026-03-20T12:10:09+5:30

Kuwait Refinery Drone Attack Marathi: इराणने कुवेतच्या मीना अल-अहमदी रिफायनरीवर ड्रोन हल्ला केला आहे. होर्मुज सामुद्रधुनीतील तणावामुळे कच्च्या तेलाचे दर १८० डॉलर्सपर्यंत जाण्याची शक्यता. वाचा सविस्तर.

Iran's massive attack on Kuwait's refinery! Fears that crude oil prices will rise to $180... | इराणचा कुवेतच्या रिफायनरीवर भीषण हल्ला! कच्च्या तेलाचे दर १८० डॉलर्सवर जाण्याची भीती व्यक्त...

इराणचा कुवेतच्या रिफायनरीवर भीषण हल्ला! कच्च्या तेलाचे दर १८० डॉलर्सवर जाण्याची भीती व्यक्त...

मध्यपूर्वेतील युद्ध आता तेल उत्पादक देशांच्या मुळावर उठले आहे. कतारनंतर आता इराणने कुवेतच्या प्रमुख 'मीना अल-अहमदी' रिफायनरीवर मध्यरात्री मोठा ड्रोन हल्ला केला आहे. या हल्ल्यामुळे रिफायनरीच्या काही युनिट्समध्ये भीषण आग लागली असून कुवेत पेट्रोलियम कॉर्पोरेशनने खबरदारीचा उपाय म्हणून तेल उत्पादन तात्पुरते थांबवले आहे.

सौदी अरेबियाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केलेली भीती आता खरी ठरताना दिसत आहे. 'वॉल स्ट्रीट जर्नल'च्या वृत्तानुसार, जर होर्मुजची सामुद्रधुनी एप्रिलपर्यंत अशीच बंद राहिली, तर कच्च्या तेलाच्या किमती १८० डॉलर्स प्रति बॅरल पर्यंत पोहोचू शकतात. सध्या ब्रेंट क्रूड ११९ डॉलर्सच्या आसपास असून इराणच्या सततच्या हल्ल्यांमुळे हे दर नियंत्रणाबाहेर जाण्याची शक्यता आहे.

किंग फैसल सेंटरचे तज्ज्ञ उमर करीम यांनी 'अल जजीरा'शी बोलताना सांगितले की, जर इराणने आपला मोर्चा तांबड्या समुद्रातील तेल टर्मिनल्सकडे वळवला, तर कच्च्या तेलाचे दर १५० ते १८० डॉलर्सच्या पार जातील. हा मार्ग युरोप आणि आशियाला जोडणारा मुख्य दुवा असल्याने भारतासारख्या आयातदार देशांसाठी हे मोठे आर्थिक संकट ठरू शकते.

जग गॅससाठी तळमळणार...

इराणने कतारच्या 'रास लफ्फान' एलएनजी प्लांटवर केलेल्या मिसाईल हल्ल्याचे पडसाद आता जागतिक स्तरावर उमटू लागले आहेत. ब्रिटनची नामांकित कन्सल्टन्सी 'वुड मॅकेंजी'ने आपल्या ताज्या अहवालात म्हटले आहे की, या हल्ल्यामुळे जागतिक गॅस बाजाराचे सर्व अंदाज कोलमडले आहेत. यापूर्वी हा अडथळा अल्पकाळासाठी असेल असे वाटत होते, मात्र आता परिस्थिती गंभीर बनली आहे. सुरुवातीला असे वाटले होते की ४ ते ६ आठवड्यांत उत्पादन पूर्ण क्षमतेने सुरू होईल. परंतु, प्रत्यक्ष पाहणीनंतर असे लक्षात आले आहे की, रास लफ्फान प्रकल्पाचे अतोनात नुकसान झाले आहे. दुरुस्तीसाठी आता कित्येक महिने किंवा त्याहून अधिक काळ लागण्याची शक्यता आहे. कतारमधील उत्पादनात होणाऱ्या प्रत्येक महिन्याच्या विलंबाचा अर्थ जागतिक एलएनजी उपलब्धतेमध्ये १.५% घट असा होईल. कतार हा जगातील सर्वात मोठा गॅस निर्यातदार असल्याने, या तुटवड्यामुळे युरोप आणि आशियाई देशांमध्ये गॅसच्या किमती गगनाला भिडू शकतात.

Web Title : कुवैत रिफाइनरी पर ईरानी हमले से तेल की कीमतों में उछाल की आशंका

Web Summary : कुवैत की मीना अल-अहमदी रिफाइनरी पर ईरान के ड्रोन हमले से तेल उत्पादन बाधित, कच्चे तेल की कीमतें 180 डॉलर प्रति बैरल तक पहुंचने की आशंका। कतर के गैस प्लांट को नुकसान से वैश्विक गैस की कमी और कीमतों में वृद्धि की आशंका, भारत जैसे आयात-निर्भर देश प्रभावित।

Web Title : Iran's Attack on Kuwait Refinery Sparks Oil Price Surge Fears

Web Summary : Iran's drone attack on Kuwait's Mina Al-Ahmadi refinery halted oil production, fueling fears of crude oil prices soaring to $180/barrel. Damage to Qatar's gas plant adds to concerns, potentially causing global gas shortages and price hikes, especially impacting import-dependent nations like India.