दुबईवर इराणचा मोठा हल्ला, प्रसिद्ध 'पाम जुमैरह'वर डागलं मिसाइल? समोर आला थरकाप उडवणारा VIDEO! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2026 23:30 IST2026-02-28T23:28:49+5:302026-02-28T23:30:39+5:30

इराणकडून करण्यात आलेल्या हल्ल्यांचे पडसाद शनिवारी दुबईतही उमटले. शहरात अनेक ठिकाणी स्फोटांचे आवाज ऐकू आले. 

Iran's major attack on Dubai, missile fired at the famous Palm Jumeirah Shocking VIDEO surfaced | दुबईवर इराणचा मोठा हल्ला, प्रसिद्ध 'पाम जुमैरह'वर डागलं मिसाइल? समोर आला थरकाप उडवणारा VIDEO! 

दुबईवर इराणचा मोठा हल्ला, प्रसिद्ध 'पाम जुमैरह'वर डागलं मिसाइल? समोर आला थरकाप उडवणारा VIDEO! 

इस्रायल आणि अमेरिकेने सुरू केलेल्या हल्ल्यांनंतर, इराणनेही प्रतिहल्ले सुरू केले आहेत. यामुळे संपूर्ण मध्य-पूर्व आशियातच मोठ्या प्रमाणावर तणाव वाढला आहे. इराणकडून करण्यात आलेल्या हल्ल्यांचे पडसाद शनिवारी दुबईतही उमटले. शहरात अनेक ठिकाणी स्फोटांचे आवाज ऐकू आले. 

प्रसिद्ध 'फेअरमोंट द पाम' हॉटेलवर इराणने क्षेपणास्त्र डागल्याचे वृत्त -
महत्वाचे म्हणजे, दुबईतील 'पाम जुमेराह' येथील प्रसिद्ध 'फेअरमोंट द पाम' हॉटेलवर इराणने क्षेपणास्त्र डागल्याचे वृत्त आहे. स्फोटाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. मात्र, हा क्षेपणास्त्र हल्ला होता की, आणखी कशामुळे आग लागली? याची अधिकृत पुष्टी अद्याप अधिकाऱ्यांकडून करण्यात आलेली नाही.

धुराचे लोट आणि आगीच्या ज्वाळा... -
एएफपीने दिलेल्या वृत्तानुसार, फेअरमोंट हॉटेलच्या बाहेर धुराचे लोट आणि आगीच्या ज्वाळा दिसत होत्या. या दुर्घटनेत चार जण जखमी झाले असून, आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे. तत्पूर्वी, संयुक्त अरब अमिरातीच्या (UAE) संरक्षण मंत्रालयाने जाहीर केले होते की, इराणकडून बॅलिस्टिक मिसाइल्सद्वारे यूएईवर स्पष्ट हल्ला केला आहे. मात्र, अमिरातीच्या एअर डिफेन्स सिस्टमने ही क्षेपणास्त्रे यशस्वीपणे रोखली.

पाम बीचवर नेमके काय घडले?
दुबई मीडिया कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, आपत्कालीन बचाव पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

रुग्णवाहिकांचा मोठा ताफा घटनास्थळाकडे -
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, पाम जुमेराह येथील हॉटेलमधून मोठ्या स्फोटाचा आवाज आला आणि त्यानंतर काळ्या धुराचे साम्राज्य पसरले. या घटनेनंतर रुग्णवाहिकांचा मोठा ताफा घटनास्थळाकडे रवाना झाला होता.
 

Web Title : दुबई पर ईरान का हमला? क्या मिसाइल ने पाम जुमेराह होटल को निशाना बनाया?

Web Summary : खबरों के अनुसार, ईरान ने दुबई के पाम जुमेराह पर हमला किया, जिससे फेयरमोंट होटल प्रभावित हुआ। विस्फोटों की आवाजें सुनी गईं, और एक वीडियो प्रसारित हो रहा है। यूएई का दावा है कि उसकी रक्षा प्रणाली ने मिसाइलों को रोका। चार लोग घायल हुए, और आपातकालीन सेवाओं ने प्रतिक्रिया दी।

Web Title : Iran Attack on Dubai? Missile Hit Palm Jumeirah Hotel?

Web Summary : Reports suggest Iran attacked Dubai's Palm Jumeirah, hitting Fairmont hotel. Explosions were heard, and a video is circulating. UAE claims its defense system intercepted missiles. Four people were injured, and emergency services responded.