चमत्कार...! इराणच्या हायपरसोनिक मिसाइलचा थरार, १० इंटरसेप्टर्सना चुकवून केला हल्ला; बघा 'खतरनाक' VIDEO
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2026 17:55 IST2026-03-02T17:54:43+5:302026-03-02T17:55:22+5:30
एक्स वर एका यूजरने हा व्हिडिओ शेअर केला आहे. त्याने कॅप्शनमध्ये लिहिले, "इराणी हाइपरसोनिक मिसाइल आपल्या लक्ष्यावर आदळण्यापूर्वी, १० हून अधिक इंटरसेप्ट रॉकेटना चुकवले." यानंतर, सोशल मेडियावर इराणच्या तंत्रज्ञानाचीही चर्चा होताना दिसत आहे.

चमत्कार...! इराणच्या हायपरसोनिक मिसाइलचा थरार, १० इंटरसेप्टर्सना चुकवून केला हल्ला; बघा 'खतरनाक' VIDEO
अमेरिका आणि इस्रायलने तीन दिवसांपूर्वी इराणवर सुरू केलेल्या हल्ल्यांचा वनवा आता संपूर्ण मध्यपूर्वेत पसरला आहे. युद्धाच्या पहिल्याच दिवशी अमेरिकेने केलेल्या बॉम्बफेकीत इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई मारले गेले यानंतर, चवताळलेल्या इराणने क्षेपणास्त्रे आणि ड्रोनच्या साहाय्याने आक्रमक प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली. यामुळे साधारणपणे संपूर्ण मध्यपूर्वेचे रूपांतर एका युद्धक्षेत्रात झाले आहे. इराणने इस्रायलसह अमेरिकेच्या मित्र राष्ट्रांनाही लक्ष्य केले आहे.
हायपरसोनिक क्षेपणास्त्राचा थरार -
या संपूर्ण संघर्षात इराणच्या एका हायपरसोनिक क्षेपणास्त्राचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. यात हे क्षेपणास्त्र आपल्या टार्गेटकडे झेपावताना दिसत आहे. या दरम्यान हे क्षेपणास्त्र, तब्बल १० हून अधिक इंटरसेप्टर क्षेपणास्त्रांना चुकवून आपले लक्ष्य भेदताना दिसत आहे. रात्रीच्या अंधारातील या व्हिडिओ फुटेजमध्ये अनेक शत्रू क्षेपणास्त्रे त्याला रोखण्यासाठी डागलेली दिसत आहेत. मात्र इराणचे हे हायपरसोनिक क्षेपणास्त्र अत्यंत वेगाने आपल्या लक्षावर जाऊन आदळते. यानंतर, जमिनीवर मोठा स्फोट होतो.
एक्स वर एका यूजरने हा व्हिडिओ शेअर केला आहे. त्याने कॅप्शनमध्ये लिहिले, "इराणी हाइपरसोनिक मिसाइल आपल्या लक्ष्यावर आदळण्यापूर्वी, १० हून अधिक इंटरसेप्ट रॉकेटना चुकवले." यानंतर, सोशल मेडियावर इराणच्या तंत्रज्ञानाचीही चर्चा होताना दिसत आहे.
💥IRANIAN HYPERSONIC MISSILE EVADES MORE THAN 10 INTERCEPT ROCKETS TO HIT TARGET
— Radar 𝘸 Archie🚨 (@RadarHits) March 1, 2026
the camera man just calmly records like it's a firework display. 🫤 pic.twitter.com/PfQzcJR3ar
अमेरिकन लढाऊ विमाने पाडली -
इराणने आजूबाजूच्या देशांमध्ये असलेल्या अमेरिकेच्या हवाई तळांना, हवाई करण्यासाठी आलेल्या लढाऊ विमानांनाही लक्ष्य केले आहे. अमेरिकेची काही एफ १५ लढाऊ विमान पडल्याचे व्हिडीओ समोर आले. कुवैतमध्ये हे विमाने पडली आहेत. कुवैतच्या संरक्षण मंत्रालयाने एक नव्हे, तर अनेक लढाऊ विमाने पाडली गेल्याचे म्हटले आहे. कुवैतमध्ये अमेरिकेचे हवाई तळ आहे. या तळालाही इराणकडून लक्ष्य करण्यात आले आहे. हवाई हल्ला करण्यासाठी येणारी काही लढाऊ विमानेही इराणकडून पाडण्यात आली आहेत.