इराणी नौदलाचे मुख्यालय उद्ध्वस्त, ९ युद्धनौकाही बुडवल्या! डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा; ४ आठवड्यांत इराण गुडघे टेकणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2026 02:59 IST2026-03-02T02:58:58+5:302026-03-02T02:59:41+5:30

9 Iranian naval ships sunk: डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणविरुद्धच्या युद्धात मोठ्या विजयाचा दावा केला आहे. अमेरिकन लष्कराने इराणच्या ९ युद्धनौका बुडवल्या असून नौदल मुख्यालय नष्ट केले आहे. १,००० हून अधिक तळांवर हल्ले झाल्याने इराण खिळखिळा झाला आहे.

Iranian Navy headquarters destroyed, 9 warships sunk! Donald Trump's big announcement; Will Iran kneel in 4 weeks? | इराणी नौदलाचे मुख्यालय उद्ध्वस्त, ९ युद्धनौकाही बुडवल्या! डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा; ४ आठवड्यांत इराण गुडघे टेकणार?

इराणी नौदलाचे मुख्यालय उद्ध्वस्त, ९ युद्धनौकाही बुडवल्या! डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा; ४ आठवड्यांत इराण गुडघे टेकणार?

वॉशिंग्टन/तेहरान: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणविरुद्धच्यायुद्धात अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला असून, इराणी नौदलाचा मोठा विनाश केल्याचा दावा केला आहे. ट्रम्प यांनी 'ट्रुथ सोशल'वर माहिती दिली की, अमेरिकन लष्कराने इराणचे नौदल मुख्यालय जवळपास पूर्णपणे उद्ध्वस्त केले असून ९ युद्धनौका समुद्रात बुडवल्या आहेत.

"मला नुकतीच माहिती मिळाली आहे की आम्ही इराणच्या ९ युद्धनौका नष्ट केल्या आहेत. त्यापैकी काही मोठ्या आणि अत्यंत महत्त्वाच्या होत्या. आम्ही आता उरलेल्या जहाजांच्या दिशेने सरकत आहोत, ती देखील लवकरच समुद्रात तळाला दिसतील!" असे ट्रम्प यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.

मुख्यालय उद्ध्वस्त: एका मोठ्या हवाई हल्ल्यात इराणच्या नौदल मुख्यालयाचा अमेरिकेने धुव्वा उडवला आहे.

४ आठवड्यांचे टार्गेट
'डेली मेल'ला दिलेल्या मुलाखतीत ट्रम्प यांनी संकेत दिले की, इराणविरुद्धचा हा संघर्ष पुढील ४ आठवड्यांत संपुष्टात येईल. "इराण हा मोठा देश असला तरी, आमचा अंदाज आहे की ही प्रक्रिया चार आठवडे किंवा त्यापेक्षा कमी वेळात पूर्ण होईल," असे त्यांनी स्पष्ट केले.

१,००० हून अधिक ठिकाणांवर हल्ले
यूएस सेंट्रल कमांडने दिलेल्या माहितीनुसार, अयातुल्ला अली खामेनेई यांच्या हत्येच्या मोहिमेपासून आतापर्यंत अमेरिकन लष्कराने इराणमधील १,००० हून अधिक लष्करी तळांवर भीषण बॉम्बफेक केली आहे. यामध्ये क्षेपणास्त्र केंद्रे, एअर डिफेन्स सिस्टिम आणि कमांड सेंटर्सचा समावेश आहे.

Web Title : ट्रंप का दावा: ईरानी नौसेना मुख्यालय तबाह, युद्धपोत डूबे; क्या ईरान करेगा आत्मसमर्पण?

Web Summary : डोनाल्ड ट्रंप का दावा है कि अमेरिकी सेना ने ईरानी नौसेना मुख्यालय को तबाह कर दिया और नौ युद्धपोतों को डुबो दिया। उन्होंने अनुमान लगाया कि ईरान चार सप्ताह के भीतर आत्मसमर्पण कर देगा, क्योंकि 1,000 से अधिक ईरानी सैन्य स्थलों पर हमले किए गए हैं।

Web Title : Trump claims destruction of Iranian Navy HQ, warships; Iran to surrender?

Web Summary : Donald Trump claims US forces decimated Iran's naval headquarters and sunk nine warships. He anticipates Iran will capitulate within four weeks, following extensive attacks on over 1,000 Iranian military sites, including missile centers and command posts.