इराणचे क्षेपणास्त्र तुर्कीच्या हवाई हद्दीत घुसले, 'नाटो'ने हवेतच उडवले! संतापलेल्या तुर्कीने इराणी राजदूताला बजावले समन्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2026 03:39 IST2026-03-05T03:37:27+5:302026-03-05T03:39:28+5:30

NATO Shoots Down Iran Missile: नाटोने पाडले इराणचे क्षेपणास्त्र; तुर्कियेच्या हद्दीत कोसळले अवशेष, इराण-तुर्किये संबंध ताणले!

Iranian missile entered Turkish airspace, NATO shot it down in the air! Angry Turkey summons Iranian ambassador | इराणचे क्षेपणास्त्र तुर्कीच्या हवाई हद्दीत घुसले, 'नाटो'ने हवेतच उडवले! संतापलेल्या तुर्कीने इराणी राजदूताला बजावले समन्स

इराणचे क्षेपणास्त्र तुर्कीच्या हवाई हद्दीत घुसले, 'नाटो'ने हवेतच उडवले! संतापलेल्या तुर्कीने इराणी राजदूताला बजावले समन्स

अंकारा/इस्तंबूल: मध्य-पूर्वेतील युद्धाची झळ आता तुर्कीपर्यंत पोहोचली आहे. इराणकडून डागलेले एक शक्तिशाली बॅलिस्टिक क्षेपणास्त्र तुर्कीच्या हवाई हद्दीत प्रवेश करत असताना नाटोच्या एअर डिफेन्स सिस्टीमने ते यशस्वीरीत्या पाडले. या घटनेमुळे संतप्त झालेल्या तुर्की सरकारने तातडीने इराणच्या राजदूताला पाचारण करून आपला तीव्र निषेध नोंदवला आहे.

क्षेपणस्त्राचा मार्ग: तुर्कीचे प्रवक्ते बुरहानेटिन दुरान यांनी दिलेल्या माहितीनुसार, इराणमधून डागलेले हे क्षेपणास्त्र इराक आणि सीरियाची हवाई हद्द ओलांडून  तुर्कीच्या दिशेने येत होते. तुर्कीच्या सीमेवर तैनात असलेल्या नाटोच्या अत्याधुनिक संरक्षण यंत्रणेने हे क्षेपणास्त्र हेरले आणि ते हवेतच नष्ट केले. या क्षेपणास्त्राचा एक मोठा तुकडा  तुर्कीच्या हटे प्रांतातील 'डोर्टीओल' जिल्ह्यात पडला आहे.

राजनैतिक तणाव
या घटनेनंतर तुर्कीच्या परराष्ट्र मंत्रालयाने अंकारा येथील इराणच्या राजदूताला तातडीने बोलावून कडक शब्दांत तंबी दिली आहे. आपल्या देशाच्या सार्वभौमत्वाला धोका निर्माण झाल्याबद्दल तुर्कीने चिंता व्यक्त केली आहे.

युद्धाचे बदलते स्वरूप
तुर्की हा नाटोचा महत्त्वाचा सदस्य देश आहे. इराणचे क्षेपणास्त्र तुर्कीच्या दिशेने येणे आणि ते नाटोने पाडणे, ही घटना या युद्धाला आंतरराष्ट्रीय वळण देणारी ठरू शकते. यामुळे इराण आणि नाटो देशांमधील तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे.

Web Title: Iranian missile entered Turkish airspace, NATO shot it down in the air! Angry Turkey summons Iranian ambassador