Iran War: "...तर मग मी हल्ला करण्यास मागेपुढे पाहणार नाही", डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला धमकी, आता काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2026 09:15 IST2026-03-19T09:12:34+5:302026-03-19T09:15:29+5:30

Donald Trump Iran War Latest Update: इस्रायलने इराणच्या साऊथ पार्स गॅस ठिकाणावर हल्ला केल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली प्रतिक्रिया आली. त्यांनी कतारचा उल्लेख करत इराणला धमकी दिली आहे. 

Iran War: "...then I will not hesitate to attack", Donald Trump's threat to Iran, what happened now? | Iran War: "...तर मग मी हल्ला करण्यास मागेपुढे पाहणार नाही", डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला धमकी, आता काय घडलं?

Iran War: "...तर मग मी हल्ला करण्यास मागेपुढे पाहणार नाही", डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला धमकी, आता काय घडलं?

Donald Trump Threatens to Iran: मध्य पूर्वेत सुरू असलेले युद्ध आणखी विकोपाला जाताना दिसत आहे. इस्रायलने इराणच्या महत्त्वाच्या साउथ पार्स गॅस ठिकाणावर हवाई हल्ला केला. त्यानंतर इराणही खवळला असून, इराणने कतारच्या तेल शुद्धीकरण प्रकल्पांना लक्ष्य केले. इराणच्या हल्ल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भडकले आणि त्यांनी इराणने पुन्हा असे केले, तर प्रत्युत्तरात हल्ला करायला मागेपुढे पाहणार नाही, अशी धमकी दिली. 

जगातील सर्वात मोठा भूगर्भातील गॅसचा साठा असलेल्या ठिकाणावर इस्रायलने हवाई हल्ला केला. इराणमधील साउथ पार्स या नैसर्गिक वायू असलेल्या ठिकाणाला इस्रायलने लक्ष्य केल्यानंतर इराणने कतारच्या सर्वात मोठ्या ऊर्जा केंद्रावर हल्ला केला. रास लाफान या कच्च्या तेलाचा साठ्या असलेल्या ठिकाणावर हल्ले झाल्यानंतर ट्रम्प यांनी संताप व्यक्त केला. 

डोनाल्ड ट्रम्प इस्रायल, इराणच्या हल्ल्यांवर काय बोलले?

"मध्य पूर्वेत झालेल्या घटनांमुळे इस्रायलने रागात इराणच्या साउथ पार्स गॅस खाण नावाच्या एका मोठठ्या ठिकाणावर हल्ला केला. या मोठ्या ठिकाणावरील छोट्या भागाचेच नुकसान झाले आहे. अमेरिकेला या विशेष हल्ल्याची कोणतीही माहिती नव्हती आणि कतारचा याच्याशी कोणत्याही प्रकारे संबंध नाहीये. कतारला या हल्ल्याची ना कोणती माहिती होती, ना कोणतीही पूर्वकल्पना", असे डोनाल्ड ट्रम्प म्हणाले. 

इस्रायल आता तिथे हल्ले करणार नाही

डोनाल्ड ट्रम्प पुढे म्हणाले की, "दुर्दैवाने इराणला याची माहिती नव्हती आणि त्यांनी कोणतेही ठोस कारण नसताना कतारच्या एलएनजी गॅस ठिकाणांच्या एका मोठ्या भागावर हल्ला केला. आता खूपच महत्त्वाच्या आणि मूल्यवान असलेल्या साउथ पार्स ठिकाणावर इस्रायलकडून कोणताही हल्ला केला जाणार नाही. निर्दोष असलेल्या कतारविरोधात इराणकडून अविवेकी पाऊल टाकले जात नाही, तोपर्यंत हल्ले केले जाणार नाही", असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. 

"अशा परिस्थितीमध्ये अमेरिका, इस्रायलच्या मदतीने, सहमतीने किंवा त्यांच्याशिवाय साउथ पार्स गॅस ठिकाण पूर्ण ताकदीने उद्ध्वस्त करून टाकेल. इतका शक्तिशाली हल्ला करू की इराणने यापूर्वी कधीही पाहिला नसेल", अशी धमकी ट्रम्प यांनी इराणला दिली आहे. 

"मी अशा पद्धतीच्या हिंसेचा आणि विध्वंसाला मंजुरी देऊ इच्छित नाही, कारण याचा इराणच्या भविष्यावर दीर्घकाळापर्यंत परिणाम होईल. पण, जर कतारच्या एलएनजी ठिकाणांवर पुन्हा हल्ला केला गेला, तर मग मी हल्ला करण्यास मागेपुढे पाहणार नाही", असे डोनाल्ड ट्रम्प इराणला म्हणाले. 

Web Title : ट्रंप की ईरान को धमकी: कतर पर हमला हुआ तो जवाबी कार्रवाई होगी

Web Summary : ट्रंप ने ईरान को कतर के एलएनजी सुविधाओं पर और हमले करने के खिलाफ चेतावनी दी है। ईरान द्वारा ईरान के साउथ पार्स गैस क्षेत्र पर कथित इजरायली हमले के बाद कतर को निशाना बनाया गया था। उन्होंने विनाशकारी जवाबी कार्रवाई की धमकी दी।

Web Title : Trump Threatens Iran: Retaliation Imminent if Qatar is Attacked Again

Web Summary : Trump warned Iran against further attacks on Qatar's LNG facilities after Iran targeted them following an alleged Israeli strike on Iran's South Pars gas field. He threatened devastating retaliation.