"होर्मुझ खुला केला नाही तर अणुकेंद्रांवर हल्ले चढवू"; देशाला संबोधित करताना ट्रम्प यांची इराणला खुली धमकी, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2026 08:43 IST2026-04-02T08:43:06+5:302026-04-02T08:43:49+5:30

इराणने होर्मूझची समुद्रधुनी तेल वाहतुकीसाठी खुली केली नाही, तर त्याच्या अणुकेंद्रांवर थेट हल्ले चढवले जातील अशी धमकी ही ट्रम्प यांनी दिली आहे.

Iran war If the Strait of Hormuz is not reopened we will launch direct attacks on Iran's nuclear facilities"; President Trump's blunt threat while addressing the nation what did he say | "होर्मुझ खुला केला नाही तर अणुकेंद्रांवर हल्ले चढवू"; देशाला संबोधित करताना ट्रम्प यांची इराणला खुली धमकी, म्हणाले...

"होर्मुझ खुला केला नाही तर अणुकेंद्रांवर हल्ले चढवू"; देशाला संबोधित करताना ट्रम्प यांची इराणला खुली धमकी, म्हणाले...


अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धाच्या पारश्वभूमीवर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज देशाला संबोधित केले. भारतीय वेळेप्रमाणे गुरुवारी सकाळी ६:३० वाजण्याच्या सुमारास त्यांनी हे २० मिनिटांचे संबोधन केले. यावेळी त्यांनी जनतेला युद्धासंदर्भात माहिती दिली आणि इराणलाही थेट इशारा दिला. एवढेच नाही तर, इराणने होर्मूझची समुद्रधुनी तेल वाहतुकीसाठी खुली केली नाही, तर त्याच्या अणुकेंद्रांवर थेट हल्ले चढवले जातील अशी धमकी ही ट्रम्प यांनी दिली आहे.

"ज्यांना होर्मुझची गरज, त्यांनी तिचे संरक्षण करावे" -
डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, "आम्हाला होर्मुझ मार्गाची काहीही गरज नाही. ज्या देशांना याची गरज आहे. त्यांनी याचे संरक्षण करायला हवे." खरे तर, अमेरिकेने इस्रायलच्या साथीने इराणवर जोरदार हल्ले केले आहेत. युद्ध सुरू होऊन एक महिना उलटून गेला आहे. इराणही अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यांना आणि धमक्यांनाही चोख उत्तर देत आहे. यातच आज ट्रम्प यांनी आपल्या 'प्राइम-टाइम' भाषणातून युद्धासंदर्भात ताजी माहिती दिली. 

"आगामी दोन-तीन आठवड्यांत इराणवर घातक हल्ले" -
दरम्यान ट्रम्प यांनी, अमेरिकन सैन्य शक्तीचे कौतुक केले. तसेच, "पडद्याआड कुटनितिक चर्चा सुरू असली तरी, आगामी दोन-तीन आठवड्यांत आपण इराणवर अत्यंत घातक हल्ले चढवणार आहोत. इराणच्या पायाभूत सुविधांनाही आता लक्ष्य केले जाईल. यावेळी त्यांनी व्हेनेझुएलातील यशस्वी लष्करी कारवाईचा उल्लेक खर आपल्या लष्कराचे कौतुक केले. 

"आता अमेरिका मध्य-पूर्वेतील ऊर्जेवर अवलंबून नाही" -
ट्रम्प पुढे म्हणाले, व्हेनेझुएलातील तेल आणि नैसर्गिक वायू साठ्यांचा विकासासंदर्भात आणि ते विकण्यासंदर्भात एकत्रितपणे काम केले जात आहे. आता अमेरिका मध्य-पूर्वेतील ऊर्जेवर अवलंबून नाही. मात्र असे असले तरी, मित्रराष्ट्रांच्या मदतीसाठी अमेरिका तेथे उपस्थितच राहील, असेही ट्र्म्प यावेळी म्हणाले.

 

Web Title : ट्रंप की ईरान को धमकी: होर्मुज जलडमरूमध्य खुला नहीं तो परमाणु हमला

Web Summary : ट्रंप ने ईरान को धमकी दी कि अगर होर्मुज जलडमरूमध्य नहीं खोला गया तो परमाणु हमले होंगे। उन्होंने अमेरिकी ऊर्जा स्वतंत्रता और आने वाले हफ्तों में ईरानी बुनियादी ढांचे पर संभावित हमलों पर प्रकाश डाला, साथ ही अमेरिकी सैन्य शक्ति की प्रशंसा की।

Web Title : Trump Threatens Iran: Nuclear Strikes if Hormuz Strait Not Open

Web Summary : Trump threatened Iran with nuclear strikes if it doesn't open the Strait of Hormuz. He highlighted US energy independence and potential strikes on Iranian infrastructure in the coming weeks, while praising American military strength.