दुबईत खासगी विमानासाठी मोजावे लागताहेत कोट्यवधी रुपये; केवळ श्रीमंतांना प्रवास शक्य, चार्टरचे भाडे २ कोटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2026 04:28 IST2026-03-05T04:27:39+5:302026-03-05T04:28:28+5:30

युद्धामुळे चार्टर्ड फ्लाइट्सची मागणी प्रचंड वाढल्याने काही लोक सुरक्षित बाहेर पडण्यासाठी २ लाख युरो (२.१६ कोटी) रुपये मोजत आहेत.

Iran War: Crores of rupees are paid for a private plane in Dubai; Only the rich can afford to travel, charter fare is 2 crores | दुबईत खासगी विमानासाठी मोजावे लागताहेत कोट्यवधी रुपये; केवळ श्रीमंतांना प्रवास शक्य, चार्टरचे भाडे २ कोटी

दुबईत खासगी विमानासाठी मोजावे लागताहेत कोट्यवधी रुपये; केवळ श्रीमंतांना प्रवास शक्य, चार्टरचे भाडे २ कोटी

दुबई : इराणयुद्धाची झळ आखाती देशांपर्यंत पोहोचल्याने हजारो प्रवासी दुबई, अबूधाबी व दोहा येथे अडकले आहेत. मात्र, काही श्रीमंत प्रवासी इराणी ड्रोन व क्षेपणास्त्र हल्ल्यांपासून सुरक्षित असलेल्या विमानतळांवरून युरोपला जाणाऱ्या खासगी, लक्झरी फ्लाइटसाठी कोट्यवधी रुपये मोजत आहेत. 

युद्धामुळे चार्टर्ड फ्लाइट्सची मागणी प्रचंड वाढल्याने काही लोक सुरक्षित बाहेर पडण्यासाठी २ लाख युरो (२.१६ कोटी) रुपये मोजत आहेत. तर अत्यंत सुरक्षित ठिकाण असलेल्या दुबईत अडकलेल्या शेकडो लोकांनी रस्ते मार्गाने प्रवास सुरू केला आहे. दुबईतील काही प्रवासी मस्कतला जात आहेत. 

अपडेट सतत तपासा, तज्ज्ञांचा सल्ला  
युद्धासारख्या गंभीर परिस्थितीत दूतावासाच्या सूचना, सुरक्षेसंदर्भातील इशारे, विमानतळ-एअरलाईन्सचे अपडेट्स सतत तपासण्याचा सल्ला आखातात अडकलेल्या प्रवाशांना तज्ज्ञांनी दिला आहे. शक्य असल्यास अनावश्यक प्रवास टाळा, रिफंड व विमा अटी काळजीपूर्वक वाचा, पर्यायी मार्ग आणि तारखा विचारात घेण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

युद्ध भडकल्यानंतर मागणी वाढल्याने झाली दरवाढ  
युद्ध भडकल्यानंतर खासगी विमानांची मागणी वाढल्याने तुटवडा निर्माण झाला आहे. १६ प्रवासी क्षमतेच्या खासगी विमानाचे रियाध ते पोर्तुगालचे भाडे सरासरी १ लाख युरो (१.०७ कोटी) होते. मात्र, त्यात आता दुप्पट वाढ झाली आहे.  आखाती देशांमधून युरोपकडे जाणाऱ्या खासगी विमानाचे भाडे १.५ ते २ लाख युरो (२.१६ कोटी) दरम्यान झाले आहेत. विमानांची टंचाई, जोखीम मूल्यांकन व मार्गातील अडथळे यामुळे भाड्यात मोठी वाढ झाली आहे. 

प्रवाशांना सूचनांवर लक्ष ठेवण्याचे आवाहन 
इराण युद्धामुळे मध्यपूर्वेतील हवाई सेवा कोलमडली असून, अमेरिकेसह अनेक देशांनी आपल्या नागरिकांसाठी दिशानिर्देश जारी केले आहेत. इराण, इस्रायलसह कतार, बहरीन, इजिप्त, इराक, जॉर्डन, कुवेत, लेबनॉन, ओमान, सौदी अरेबिया, सीरिया, यूएई व येमेन येथून शक्य तितक्या लवकर खासगी विमानाने बाहेर पडण्याचे आवाहन अमेरिकेने त्यांच्या नागरिकांना केले आहे. चीन, इटली, फ्रान्स व जर्मनीनेही आपल्या नागरिकांसाठी विशेष प्रयत्न सुरू केले आहेत.  

Web Title : ईरान युद्ध के बीच दुबई में निजी जेट की कीमतें आसमान छू रही हैं

Web Summary : ईरान युद्ध तनाव के बीच, दुबई में निजी जेट की मांग बढ़ी। अमीर लोग भागने के लिए लाखों का भुगतान करते हैं। चार्टर्ड उड़ानों की कीमत अब ₹2 करोड़ से अधिक है। कई फंसे हुए यात्री वैकल्पिक मार्ग तलाश रहे हैं।

Web Title : Dubai Private Jet Costs Soar Amidst Iran War Tensions

Web Summary : Amidst Iran war tensions, private jet demand in Dubai surges. The wealthy pay millions to escape. Chartered flights now cost over ₹2 crore. Many stranded travelers seek alternative routes.