युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2025 20:22 IST2025-06-21T20:21:31+5:302025-06-21T20:22:22+5:30

इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांनी आपल्या संभाव्य उत्तराधिकारी म्हणून तीन मौलवींची नावे पुढे केली आहेत

Iran under threat of war, Khamenei chooses three potential successors, but no name for the child! | युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!

युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!

इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांनी आपल्या संभाव्य उत्तराधिकारी म्हणून तीन मौलवींची नावे पुढे केली आहेत. मात्र, या तिघांची ओळख अद्याप उघड करण्यात आलेली नाही. विशेष म्हणजे, या शर्यतीत खामेनेई यांच्या मुलाचा समावेश नाही, हे यातून स्पष्ट झाले आहे.

इराण आणि इस्रायल यांच्यातील संघर्ष तीव्र होत असताना, इस्रायलच्या संरक्षण दलांकडून इराणचे मोठे लष्करी अधिकारी आणि प्रमुख व्यक्तींना सातत्याने लक्ष्य केले जात आहे. अशा परिस्थितीत, इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई आपल्या उत्तराधिकारी निवडण्याबाबत गांभीर्याने विचार करत असल्याचे वृत्त समोर आले आहे.

खामेनेईंनंतर सर्वोच्च नेतेपदाची सूत्रे कोण सांभाळणार?
येरुशलेम पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार, द न्यूयॉर्क टाइम्सने शनिवारी आपल्या एका अहवालात दावा केला आहे की, इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांनी तीन वरिष्ठ मौलवींची नावे आपले उत्तराधिकारी म्हणून पुढे केली आहेत. इस्रायलसोबत सुरू असलेल्या संघर्षादरम्यान जर त्यांची हत्या झाली, तर अशा स्थितीत त्या तिघांपैकी एक जण त्यांचे पदभार सांभाळेल.

खामेनेईंनी उत्तराधिकारी निवडणाऱ्या सभेला दिली नावे
अहवालानुसार, खामेनेईंनी इराणच्या सर्वोच्च नेता निवडणाऱ्या तज्ज्ञ मौलवींच्या सभेला निर्देश दिले आहेत की, त्यांनी दिलेल्या तीन नावांपैकी कोणत्याही एकाला ते आपला उत्तराधिकारी म्हणून निवडू शकतात.

खामेनेई सुरक्षित स्थळी
खामेनेई आता एका सुरक्षित भूमिगत ठिकाणाहून कामकाज करत आहेत आणि एका विश्वासू सहकाऱ्यामार्फत सगळ्यांशी संवाद साधत आहेत. त्यांनी केवळ आपल्या संभाव्य उत्तराधिकाऱ्यांची नावेच दिली नाहीत, तर वरिष्ठ कमांडर्स मारले गेल्यास महत्त्वाच्या लष्करी पदांसाठी बॅकअपचीही घोषणा केली आहे.

तीन मौलवींमध्ये खामेनेईंच्या मुलाचे नाव नाही!
अहवालात असेही म्हटले आहे की, अयातुल्ला खामेनेई यांचा मुलगा मोजतबा, जो स्वतः एक मौलवी आहे आणि इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड्स कॉर्प्सच्या जवळचा मानला जातो. पण, खामेनेईंचा उत्तराधिकारी म्हणून त्याचे नाव देण्यात आलेले नाही. या पदासाठी तो आघाडीवर असल्याची चर्चा होती.

Web Title: Iran under threat of war, Khamenei chooses three potential successors, but no name for the child!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.