इराणचा अमेरिकन बेसवर महाभयंकर हल्ला! अमेरिकेच्या क्षेपणास्त्रांचे स्फोटांवर स्फोट थांबेनात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2026 02:25 IST2026-03-02T02:23:11+5:302026-03-02T02:25:25+5:30

Iran strikes US Base Iraq drone attack: इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सने रविवारी मोठ्या प्रमाणावर हल्ले केले. रियाध, दुबई, अबू धाबी, दोहा, मनामा, यरुशलम आणि तेल अवीव या शहरांमध्ये भीषण स्फोटांचे आवाज ऐकू आले आहेत. या हल्ल्यांमध्ये इस्रायलमध्ये ४ जणांचा मृत्यू झाला आहे. 

Iran strikes US Base Iraq drone attack: Iran launches massive attack on US airbase! Missiles fired at military base in Iraq, US missiles explode on explosions | इराणचा अमेरिकन बेसवर महाभयंकर हल्ला! अमेरिकेच्या क्षेपणास्त्रांचे स्फोटांवर स्फोट थांबेनात

इराणचा अमेरिकन बेसवर महाभयंकर हल्ला! अमेरिकेच्या क्षेपणास्त्रांचे स्फोटांवर स्फोट थांबेनात

तेहरान/तेल अवीव: इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खमेनेई यांच्या मृत्यूनंतर पश्चिम आशियात युद्धाचा वणवा अधिकच भडकला आहे. इराणने रविवारी रात्रीपासून 'युद्धाचा नवा टप्पा' जाहीर करत इस्रायल आणि शेजारील देशांतील अमेरिकन तळांवर क्षेपणास्त्रांचा पाऊस पाडला आहे. इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेजेशकियन यांनी खमेनेईंच्या हत्येला 'मुस्लिम जगाविरुद्धचे युद्ध' घोषित केले आहे.

इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सने रविवारी मोठ्या प्रमाणावर हल्ले केले. रियाध, दुबई, अबू धाबी, दोहा, मनामा, यरुशलम आणि तेल अवीव या शहरांमध्ये भीषण स्फोटांचे आवाज ऐकू आले आहेत. या हल्ल्यांमध्ये इस्रायलमध्ये ४ जणांचा मृत्यू झाला आहे. 

इराकमधील अमेरिकन तळावर ड्रोन हल्ला
इराणने इराक मधील अमेरिकन लष्करी तळांना लक्ष्य करत आत्मघातकी ड्रोन डागले आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्याला न जुमानता इराणने 'सेल्फ-डिफेंस' (स्वसंरक्षण) च्या नावाखाली हे हल्ले सुरू ठेवले आहेत. इराणच्या एका आत्मघातकी ड्रोनने इराकच्या इरबिल येथील अमेरिकन लष्करी तळावरील दारूगोळा कोठाराला थेट लक्ष्य केले. या हल्ल्यामुळे तळावर साठवलेल्या स्फोटकांचे एकामागून एक भीषण स्फोट झाले असून संपूर्ण परिसरात आगीचे मोठे लोळ पाहायला मिळत आहेत.

खामेनेईंच्या मृत्यूचा बदला
खामेनेई यांची हत्या हा एक अक्षम्य गुन्हा आहे आणि त्याचा बदला घेणे हे इराणचे कर्तव्य आहे," असे प्रतिपादन राष्ट्राध्यक्ष पेजेशकियन यांनी केले आहे. इराणने आता जमीन आणि समुद्र अशा दोन्ही आघाड्यांवर हल्ले तीव्र करण्याची घोषणा केली आहे. इराणच्या लष्करी अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की, त्यांच्या स्वसंरक्षणाच्या अधिकाराला आता कोणतीही सीमा उरलेली नाही. संपूर्ण आखाती क्षेत्रात आता दहशतीचे वातावरण आहे.

Web Title : खामenei की मृत्यु के बाद ईरान ने अमेरिकी ठिकानों पर हमला किया, मध्य पूर्व संघर्ष बढ़ा

Web Summary : अयातुल्ला खामenei की मृत्यु के बाद, ईरान ने 'मुस्लिमों के खिलाफ युद्ध' के प्रतिशोध का दावा करते हुए अमेरिकी ठिकानों और इजरायली शहरों पर मिसाइल हमले शुरू किए। रियाद, दुबई और यरुशलम में विस्फोट हुए। एक ईरानी ड्रोन ने इराक में एक अमेरिकी अड्डे पर हमला किया, जिससे भारी विस्फोट और आग लग गई। ईरान ने तीव्र हमलों का संकल्प लिया।

Web Title : Iran Attacks US Bases After Khamenei's Death, Escalating Middle East Conflict

Web Summary : Following Ayatollah Khamenei's death, Iran launched missile attacks on US bases and Israeli cities, claiming retaliation for a 'war against Muslims.' Explosions rocked Riyadh, Dubai, and Jerusalem. An Iranian drone struck a US base in Iraq, triggering massive explosions and fires. Iran vows intensified attacks.