इराणचा इस्रायलवर घाव! एअर डिफेन्स कवच भेदत बेतशेमेशमध्ये डागली मिसाईल; १२ लोक ठार, अनेक जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2026 10:47 IST2026-03-02T10:46:45+5:302026-03-02T10:47:48+5:30

Iran Israel News: इस्रायल आणि अमेरिकेने हल्ले सुरू केल्यानंतर इराणकडूनही पलटवार केला जात आहे. इराणने इस्रायलमधील जेरुसलेमध्ये मिसाईल डागली. यात १२ जण ठार झाले आहेत. 

Iran strikes Israel! Missile hits Bet Shemesh, pierces air defense shield; 12 killed, many injured | इराणचा इस्रायलवर घाव! एअर डिफेन्स कवच भेदत बेतशेमेशमध्ये डागली मिसाईल; १२ लोक ठार, अनेक जखमी

इराणचा इस्रायलवर घाव! एअर डिफेन्स कवच भेदत बेतशेमेशमध्ये डागली मिसाईल; १२ लोक ठार, अनेक जखमी

Iran Israel News Marathi: इस्रायल आणि अमेरिकेने सर्वोच्च नेते अयातुल्लाह अली खामनेई यांची हत्या केल्याने इराण खवळला आहे. इराणकडूनइस्रायल आणि आजूबाजूच्या देशात असलेल्या अमेरिकेच्या हवाई तळांना लक्ष्य केले जात आहे. इराणच्या हल्ल्याचा नवीन व्हिडीओ समोर आला आहे. इराणने इस्रायलची एअर डिफेन्स प्रणाली भेदत जेरुसलेममध्ये मिसाईल डागली. बेतशेमेशमध्ये करण्यात आलेल्या या हल्ल्यात १२ नागरिक ठार झाले असून, अनेक जखमी झाले आहेत. 

अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यानंतर आणि खामनेई यांच्या मृत्यूनंतर इराणने शत्रू देशांवरील हल्ल वाढवले आहेत. इस्रायलच्या जेरुसलेममध्ये असलेल्या बेतशेमेश येथे इराणने बॅलेस्टिक मिसाईल डागली. डिफेन्स प्रणाली भेदून आलेल्या या मिसाईलने मोठी जीवित आणि वित्त हानी झाली आहे. 

इस्रायलच्या इरोण डोम, डेव्हिड स्लिंग आणि अॅरो यांनी इराणकडून डागण्यात आलेल्या मिसाईल आणि ड्रोन हवेत नष्ट केले. मात्र, काही मिसाईल आणि ड्रोन प्रणाली भेदून इस्रायलमध्ये कोसळल्या. यात अनेक नागरिकांचा मृत्यू झाल्याचे स्थानिक माध्यमांनी म्हटले आहे. 

बेतशेमेशमध्ये घातक हल्ला

इराणने रविवारी इस्रायलवर सर्वात घातक हल्ला केला. इराणची बॅलेस्टिक मिसाईलने जेरुसलेम शहराच्या पश्चिमेला असलेल्या बेतशेमेशला लक्ष्य केले. मिसाईलच्या हल्ल्यात अनेक इमारती, युद्ध काळातील भुयारी शिबिरांचे नुकसान झाले आहे. 

हिजबुल्लाहचे इस्रायलवर हल्ले

इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह अली खामेनेई यांची इस्रायल-अमेरिकेकडून हत्या करण्यात आल्यानंतर हिजबुल्लाहने इस्रायलवर हल्ले सुरू केले आहेत. 

इस्रायलच्या लष्कराने म्हटले आहे की, आम्ही हिजबुल्लाहकडून डागण्यात आलेल्या मिसाईल, ड्रोनला जबाब देण्यासाठी लेबनॉनवर हल्ले करत आहोत. 

हिजबुल्लाहने दाव्याला दुजोरा दिला आहे की, आम्ही लेबनॉनमधून इस्रायलवर मिसाईल आणि ड्रोन डागले आहेत. खामेनेईच्या हत्येचा बदला म्हणून हल्ले करत असल्याचे हिजबुल्लाहने म्हटले आहे. 

Web Title : ईरान का इस्राइल पर हमला: बेत शेमेश में मिसाइलें, हताहत।

Web Summary : खामेनेई की मौत का बदला लेते हुए ईरान ने इस्राइल को निशाना बनाया। मिसाइलें बेत शेमेश, येरुशलम में गिरीं, रक्षा प्रणाली टूटी। बढ़ते तनाव और जवाबी हमलों के बीच हताहत।

Web Title : Iran strikes Israel: Missiles hit Beit Shemesh, casualties reported.

Web Summary : Iran retaliated for Khamenei's death, targeting Israel. Missiles struck Beit Shemesh, Jerusalem, breaching defense systems. Casualties reported amid heightened tensions and counterattacks from both sides, escalating regional conflict.