इराणमधील शाळेवर हल्ला, १७० मुलींचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार प्रमुखांनी केली न्यायाची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2026 15:48 IST2026-03-27T15:47:30+5:302026-03-27T15:48:28+5:30

Iran school bomb blast 170 dead UN : इराणमधील मुलींच्या शाळेवर बॉम्ब हल्ला: १७० विद्यार्थिनींचा मृत्यू. संयुक्त राष्ट्रांचे मानवाधिकार प्रमुख वोल्कर तुर्क यांची न्यायाची मागणी.

Iran school bomb blast 170 dead UN : 170 girls killed in Iran school attack; UN human rights chief demands justice | इराणमधील शाळेवर हल्ला, १७० मुलींचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार प्रमुखांनी केली न्यायाची मागणी

इराणमधील शाळेवर हल्ला, १७० मुलींचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार प्रमुखांनी केली न्यायाची मागणी

इराणमधील मिनाब शहरात असलेल्या 'शाजरेह तय्येबेह एलिमेंट्री स्कूल' या मुलींच्या शाळेवर २८ फेब्रुवारी रोजी झालेल्या भीषण बॉम्बस्फोटाचा पडसाद आता जागतिक स्तरावर उमटत आहेत. संयुक्त राष्ट्रांचे मानवाधिकार प्रमुख वोल्कर तुर्क यांनी या अमानवीय कृत्यासाठी जबाबदार असणाऱ्यांना तातडीने कठोर शिक्षा मिळावी, अशी मागणी केली आहे.

२८ फेब्रुवारी रोजी झालेल्या या आत्मघातकी हवाई हल्ल्यात १७० हून अधिक जणांना आपला जीव गमवावा लागला. मृतांमध्ये बहुतांश प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या लहान मुलींचा व  त्यांना शकविणाऱ्या शिक्षकांचा समावेश होता. जिनिव्हा येथे झालेल्या संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत बोलताना वोल्कर तुर्क यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला. "मुलींच्या शिक्षणावर आणि त्यांच्या जीवनावर झालेला हा हल्ला केवळ इराणवरच नाही, तर संपूर्ण मानवतेवरचा हल्ला आहे," असे त्यांनी म्हटले आहे.

तातडीने तपासाची मागणी
या प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करून हल्ल्यामागील व्यक्तींचा शोध घ्यावा आणि पीडितांच्या कुटुंबांना न्याय द्यावा, असे निर्देश तुर्क यांनी दिले आहेत. संयुक्त राष्ट्रांत इराणने हा मुद्दा मांडला होता. अशाप्रकारे निष्पाप लोकांचा इस्रायल आणि अमेरिकेने जीव घेतल्याचे इराणनने म्हटले होते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इस्रायलचे पंतप्रधान युद्ध गुन्हेगार असल्याचा आरोप इराणने केला होता. 

Web Title : ईरान स्कूल हमला: संयुक्त राष्ट्र ने 170 लड़कियों की मौत पर न्याय मांगा

Web Summary : ईरान में लड़कियों के स्कूल पर हमले में 170 की मौत के बाद संयुक्त राष्ट्र ने न्याय की मांग की। संयुक्त राष्ट्र मानवाधिकार प्रमुख ने हमले की निंदा की, पीड़ितों के परिवारों के लिए गहन जांच और न्याय का आह्वान किया। ईरान ने इस्राइल और अमेरिका पर आरोप लगाया।

Web Title : Iran School Attack: UN Demands Justice for 170 Girls Killed

Web Summary : UN demands justice after a deadly attack on an Iranian girls' school killed 170. The UN Human Rights Chief condemned the attack, calling for thorough investigation and justice for victims' families. Iran accuses Israel and the US.