इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2026 17:50 IST2026-04-03T17:49:59+5:302026-04-03T17:50:54+5:30

Iran War News: अमेरिका आणि इस्राइलने इराणविरोधात सुरू केलेलेल्या युद्धामुळे आखाती देशांमध्ये तणावपूर्ण परिस्थिती कायम आहे. यादरम्यान, इराणने आपल्या शेजारील आखाती देशांनाही आता लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे.

Iran preparing to threaten Gulf countries, attacks on water and gas projects, new move creates excitement | इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ

इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ

अमेरिका आणि इस्राइलने इराणविरोधात सुरू केलेलेल्या युद्धामुळे आखाती देशांमध्ये तणावपूर्ण परिस्थिती कायम आहे. यादरम्यान, इराणने आपल्या शेजारील आखाती देशांनाही आता लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. एकीकडे अमेरिका आणि इस्राइलकडून इराणमधील पायाभूत सुविधांना लक्ष्य केले जात असल्याने आता इराणकडून याला पलटवार म्हणून आखाती देशातील पाणी आणि गॅसच्या प्रकल्पांवर हल्ले होऊ लागले आहेत. आज इराणने कुवेत आणि आबू धाबी येथील प्रकल्पांवर मोठे हल्ले केल्याने आखातामधील तणाव आणखीनच वाढला आहे.

आज अबू धाबीमधील हबशन गॅस फॅसिलिटीजवळ करण्यात आलेला हल्ला एअर डिफेन्स सिस्टिमकडून इंटरसेप्ट करण्यात आला. मात्र त्यानंतर खाली कोसळलेल्या तुकड्यांमुळे आग भडकली. स्थानिक प्रशासनाने त्वरित काहलाची करत या प्रकल्पाचं संचालन तात्पुरतं बंद केलं. दिलासादायक बाब म्हणजे या हल्ल्यात कुठलीही जीवितहानी झाल्याचं वृत्त आलेलं नाही.

दुसरीकडे इराणकडून कुवेतमध्ये याहूनही मोठा हल्ला करण्यात आला. येथील एका मोठ्या वॉटर डिसेलिनेशन प्रकल्पावर करण्यात आळेल्या हल्ल्यात प्रकल्पाच्या काही भागाचं नुकसान झालं आहे. कुवेतमधील सुमारे ९० टक्के पाणी हे याच प्रकल्पातून येत असल्याने हा प्रकल्प कुवेतसाठी खूप महत्त्वपूर्ण आहे.

या प्रकल्पासोबतच कुवेतमधील मीना अल अहमदी तेलशुद्धिकरण कारखान्यावरही ड्रोन हल्ला करण्यात आला. त्यामुळे या प्रकल्पातील अनेक भागांत आग भडकली. अग्निशमन दलाकडून ही आग शमवण्याचं काम सुरू आहे. 

Web Title : ईरान ने खाड़ी देशों के जल, गैस ठिकानों को बनाया निशाना, तनाव बढ़ा

Web Summary : अमेरिका-इज़राइल तनाव के बीच, ईरान ने खाड़ी देशों के जल और गैस ठिकानों पर हमले किए। कुवैत और अबू धाबी में परियोजनाओं पर हमला, आग और व्यवधान। तनाव और बढ़ा।

Web Title : Iran Targets Gulf Nations' Water, Gas Facilities Amid Rising Tensions

Web Summary : Amid US-Israel tensions, Iran attacks Gulf states' water and gas facilities. Kuwait and Abu Dhabi projects were hit, causing fires and disruptions. Tensions escalate further.