इराणकडून १० लाख सैन्याची जमवाजमव! भरतीलाही आला वेग, काय घडतेय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2026 15:20 IST2026-03-27T15:19:39+5:302026-03-27T15:20:18+5:30

ran military recruitment: इराणने युद्धभूमीवर १० लाख सैनिक उतरवले. अमेरिकेकडून १०,००० अतिरिक्त सैनिकांची तयारी.

Iran mobilizes 1 million troops! Recruitment has also accelerated, what is happening? | इराणकडून १० लाख सैन्याची जमवाजमव! भरतीलाही आला वेग, काय घडतेय?

इराणकडून १० लाख सैन्याची जमवाजमव! भरतीलाही आला वेग, काय घडतेय?

मध्यपूर्वेतील तणाव आता टोकाला पोहोचला आहे. अमेरिका जमिनीवरून हल्ला करण्याच्या शक्यतेने इराणने १० लाख सैनिक तैनात करण्याचा दावा केला आहे. दुसरीकडे, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणने चर्चेसाठी सकारात्मक पाऊल उचलल्याचे सांगत १० तेल टँकर्स सोडल्याची माहिती दिली आहे.

अमेरिकेच्या संभाव्य हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर इराणमध्ये तरुणांची लष्करी भरतीसाठी लाट उसळली आहे. 'बसीज' आणि 'रिव्होल्यूशनरी गार्ड्स'मध्ये लाखो तरुण सहभागी होत असून इराणने १० लाख सैनिकांची कुमक तयार केल्याचे जाहीर केले आहे. तर 'वॉल स्ट्रीट जर्नल'च्या वृत्तानुसार, अमेरिका मध्यपूर्वेतील आपल्या ५,००० मरीन्स आणि ८२ व्या एअरबोर्न डिव्हिजनच्या २,००० पॅराट्रूपर्सना साथ देण्यासाठी आणखी १०,००० सैनिक पाठवण्याचा विचार करत आहे.

फिनलंडचा 'कोरोना' इशारा
फिनलंडचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर स्टब यांनी इशारा दिला आहे की, हे युद्ध जागतिक मंदी आणू शकते, ज्याचे परिणाम कोविड महामारीपेक्षाही भयानक असतील. त्यांनी ट्रम्प यांच्या 'अमेरिका फर्स्ट' धोरणावरही टीका केली आहे.

ट्रम्प यांचा 'टँकर गिफ्ट'चा दावा
डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये सांगितले की, इराणने विश्वासाचे नाते निर्माण करण्यासाठी पाकिस्तानचा ध्वज असलेले १० तेल टँकर्स सुरक्षितपणे जाऊ दिले आहेत. हे इराणकडून मिळालेले 'गिफ्ट' असून ते चर्चेसाठी गंभीर असल्याचे लक्षण आहे.

पाकिस्तानमध्ये ऐतिहासिक बैठक? 
जर्मनीचे परराष्ट्र मंत्री जोहान वाडेफुल यांच्या दाव्यानुसार, अमेरिका आणि इराणमध्ये आतापर्यंत पडद्यामागून चर्चा सुरू होती. मात्र, आता दोन्ही देश लवकरच पाकिस्तानमध्ये थेट समोरासमोर चर्चा करण्याची शक्यता आहे.

Web Title : ईरान ने मध्य पूर्व तनाव के बीच 10 लाख सैनिक जुटाए

Web Summary : अमेरिका के तनाव के बीच, ईरान ने 10 लाख सैनिकों को तैयार बताया। सैन्य भर्ती बढ़ी। वैश्विक मंदी की चेतावनी जारी। ईरान ने तेल टैंकरों को 'उपहार' के रूप में छोड़ा, पाकिस्तान में वार्ता की संभावना है।

Web Title : Iran Amasses 1 Million Troops Amid Rising Middle East Tensions

Web Summary : Amid US tensions, Iran claims 1 million troops are ready. Military recruitment surges. A global recession warning is issued. Iran reportedly released oil tankers as a 'gift', signaling potential talks in Pakistan.