इराणमध्ये लष्कराच्या परेडवर हल्ला; 24 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2018 17:10 IST2018-09-22T17:10:05+5:302018-09-22T17:10:46+5:30

इराणमध्ये लष्कराच्या परेडवर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केल्याची घटना शनिवारी घडली. या गोळीबारात आतापर्यंत 24 जणांचा मृत्यू झाला असून जवळपास 53 जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. 

Iran military parade attacked by gunmen in Ahvaz | इराणमध्ये लष्कराच्या परेडवर हल्ला; 24 जणांचा मृत्यू

इराणमध्ये लष्कराच्या परेडवर हल्ला; 24 जणांचा मृत्यू

तेहरान : इराणमध्ये लष्कराच्या परेडवर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केल्याची घटना शनिवारी घडली. या गोळीबारात आतापर्यंत 24 जणांचा मृत्यू झाला असून जवळपास 53 जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, येथील स्थानिक वेळेनुसार सकाळी 9 च्या सुमाराला इराणच्या अहवाज शहरात लष्कराची परेड सुरू होती. यावेळी हल्लेखोर लष्करी गणवेशात आले होते. त्यांनी परेड सुरु असताना एका पार्क जवळून गोळीबार केला. एकूण चार हल्लेखोर होते. त्यापैकी दोन हल्लेखोर सुरक्षा दलांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारवाईत मारले गेले, तर दोघा हल्लेखोरांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, या गोळीबारात 24 जणांचा मृत्यू झाला असून जवळपास 53 जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये नागरिकांचा समावेश आहे.


हा हल्ला इसिस या दहशतवादी संघटनेकडून केला असावा असा स्थानिक मीडियाचा अंदाज आहे. तसेच, सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगण्यात येत आहे.

Web Title: Iran military parade attacked by gunmen in Ahvaz