हिंद महासागरात इराणी युद्धनौकेवर अमेरिकेचा हल्ला, भारतासाठी चिंताजनक; श्रीलंकन खासदाराला वेगळीच शंका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2026 14:22 IST2026-03-05T14:19:48+5:302026-03-05T14:22:26+5:30

भारतासाठी ही घटना अतिशय महत्त्वाची आहे कारण हिंद महासागरात सागरी सुरक्षा, व्यापारी मार्ग आणि ऊर्जा पुरवठ्यासाठी हा प्रमुख मार्ग आहे

Iran-Isreal War: American attack in the Indian Ocean is worrisome for India; Sri Lankan MP has different doubts | हिंद महासागरात इराणी युद्धनौकेवर अमेरिकेचा हल्ला, भारतासाठी चिंताजनक; श्रीलंकन खासदाराला वेगळीच शंका

हिंद महासागरात इराणी युद्धनौकेवर अमेरिकेचा हल्ला, भारतासाठी चिंताजनक; श्रीलंकन खासदाराला वेगळीच शंका

मध्य पूर्वेतील तणावात हिंद महासागरात अमेरिकेने इराणच्या युद्धनौकेवर केलेला हल्ला भारताची सुरक्षा आणि प्रादेशिक स्थिरतेसाठी चिंताजनक आहे. हा हल्ला श्रीलंकेच्या दक्षिणी किनारपट्टीच्या आसपास आंतरराष्ट्रीय सागरी क्षेत्रात झाला. जो भाग श्रीलंकेच्या शोध आणि बचाव क्षेत्राच्या कक्षेत येतो.

या बुडत्या जहाजातून ३२ इराणी कर्मचाऱ्यांना वाचवण्यात आले. या घटनेनंतर आजही अनेक जण बेपत्ता आहेत अशी पुष्टी श्रीलंकेच्या नौदलाने केली. या घटनेवर श्रीलंकेतील खासदार नमल राजपक्षे म्हणाले की, ही घटना श्रीलंकेसाठी आणि हिंद महासागरासाठी गंभीर चिंतेचा विषय आहे. भारतासाठीही सुरक्षेच्या दृष्टीने हे चिंताजनक आहे. युद्ध अनेक मैल दूरीवर होत आहे परंतु हिंद महासागरातील ही हालचाल श्रीलंकेच्या किनाऱ्यापासून फक्त चाळीस नॉटिकल मैल अंतरावर आहे असं त्यांनी सांगितले.

इराणी युद्धनौकेवरील हल्ला भारतासाठी चिंतेची बाब का?

भारतासाठी ही घटना अतिशय महत्त्वाची आहे कारण हिंद महासागरात सागरी सुरक्षा, व्यापारी मार्ग आणि ऊर्जा पुरवठ्यासाठी हा प्रमुख मार्ग आहे. भारत आपल्या तेलाचा आवश्यक साठा याच सागरी मार्गाने आयात करतो. त्यामुळे कुठल्याही सैन्य संघर्षात या सागरी मार्गावरील वाहतूक आणि ऊर्जा पुरवठ्यावर परिणाम करू शकतो. अमेरिकेच्या या कारवाईची आधी माहिती होती का याचे उत्तर श्रीलंकेच्या सरकारने द्यावे अशी मागणी खासदार नमल राजपक्षे यांनी केली आहे. अमेरिकेने अंधारात ठेवून ही कारवाई केली का याची जनतेला माहिती असावी असं त्यांनी सांगितले.

दरम्यान, जर सरकारला याची माहिती होती मग त्यांनी जनतेपासून का लपवले? जर हल्ल्याची माहिती नसेल तर सागरी क्षेत्रात इतकी मोठी कारवाई कुठल्याही सूचनेशिवाय कशी झाली हा गंभीर प्रश्न आहे. भारत सरकार आणि दक्षिण आशियातील देशांनी हा मुद्दा गंभीरतेने घ्यायला हवा. प्रादेशिक स्तरावर यावर विचार करायला हवा असंही खासदार नमल राजपक्षे यांनी म्हटलं.

अमेरिकेच्या पाणबुडीने केला हल्ला

हिंद महासागरात इराणची युद्धनौका 'IRIS Dena' अमेरिकन पाणबुडीने टॉरपीडो डागून बुडवली. यामुळे दोन्ही देशांतील तणाव अधिकच वाढला आहे. महत्वाचे म्हणजे ही युद्धनौका भारतात आयोजित एका नौदल सरावात सहभागी होऊन परतत असताना हा हल्ला झाला. या घटनेनंतर इराण प्रचंड भडकला असून आंतरराष्ट्रीय पाण्यात केलेल्या या हल्ल्यासाठी अमेरिकेला गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा दिला आहे.

Web Title : हिंद महासागर में ईरानी युद्धपोत पर अमेरिकी हमले से चिंता बढ़ी।

Web Summary : हिंद महासागर में ईरानी युद्धपोत पर अमेरिका के हमले से भारत की सुरक्षा को खतरा है। श्रीलंका के पास हुई घटना पर श्रीलंकाई सांसद ने हमले की पूर्व जानकारी पर सवाल उठाए, क्षेत्रीय सुरक्षा पर जोर दिया।

Web Title : US attack on Iranian warship in Indian Ocean raises concerns.

Web Summary : America's attack on an Iranian warship in the Indian Ocean raises concerns for India's security. The incident occurred near Sri Lanka. A Sri Lankan MP demands answers regarding prior knowledge of the attack, highlighting regional security implications.