जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 19:05 IST2025-06-25T19:04:41+5:302025-06-25T19:05:24+5:30
Iran-Israel War: इराणनने या पर्वतात सर्वात मोठा अणुउर्जा प्रकल्प उभारल्याची माहिती मिळत आहे.

जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
Iran-Israel War: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रविवार(२० जून) सांगितले की, अमेरिकन विमान बी-२ बॉम्बरने इराणमधील सर्वात सुरक्षित ठिकाण फोर्डो उद्ध्वस्त केले. तसेच, इतर अणुस्थळ नतान्झ आणि इस्फहान देखील नष्ट करण्यात आले आहेत. काही वृत्तांत असा दावा करण्यात आला आहे की, इराणने हल्ल्यापूर्वीच फोर्डोहून आपले युरेनियम एका गुप्त ठिकाणी हलवले असून, तेथून ते सहजपणे आपला अणुकार्यक्रम सुरू ठेवू शकतात.
8/ Meanwhile, the Fordow Fuel Enrichment Plant (FFEP) and the new underground Natanz facility at Mt. Kolang Gaz La—Iran’s most fortified nuclear sites—appear untouched. Both are reportedly buried tens of meters underground, beneath reinforced concrete and solid mountain rock. pic.twitter.com/msOS0FUxAv
— Francesco Salesio Schiavi (@frencio_schiavi) June 13, 2025
मीडिया रिपोर्ट्सनुसार, इराणमधून ४०० किलो युरेनियम गहाळ झाले आहे. इराणने हे युरेनियम कुह-ए-कोलांग गज(पिकॅक्स पर्वत) मध्ये लपवल्याचा अंदाज आहे. दावा केला जातो की, इराणने या पर्वतात फोर्डोपेक्षाही मोठा अणुउर्जा प्रकल्प बांधला आहे, ज्याबद्दल कोणालाही फारशी माहिती नाही. अमेरिका आणि इस्रायली सरकारे म्हणतात की, त्यांनी त्यांच्या हल्ल्यांनी इराणचा अणुकार्यक्रम नष्ट केला. परंतु दुसरीकडे, ट्रम्प असेही म्हणतात की, इराणने अणु करार स्वीकारला पाहिजे. जर अमेरिकेच्या हल्ल्यात इराणचा अणुकार्यक्रम नष्ट झालाय, तर मग ते कोणत्या अणुकराराबद्दल बोलत आहेत?
अमेरिका-इस्रायलचा सुगावाही लागणार नाही
आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेच्या (IAEA) महासंचालकांनी इराणला पिकॅक्स पर्वताखाली काय चालले आहे? असे विचारले, तेव्हा इराणचे उत्तर थोडक्यात आणि तीक्ष्ण होते. इराणी अधिकाऱ्यांनी म्हटले, "याचा तुमच्याशी काहीही संबंध नाही." या पर्वतातील प्रकल्प फोर्डोपेक्षाही मजबूत असल्याचे म्हटले जाते.
एप्रिलमध्ये इन्स्टिट्यूट फॉर सायन्स अँड इंटरनॅशनल सिक्युरिटीने प्रकाशित केलेल्या उपग्रह प्रतिमेवरून असे दिसून आले की, या पर्वताच्या तळाभोवती एक नवीन सुरक्षा रिंग बांधत आहे. ISIS ने एप्रिलच्या मूल्यांकनात म्हटले की, या ठिकाणी फोर्डोपेक्षाही मोठा आणि खोलवर पसरलेला हॉल आहेत. याबद्दल अद्याप फारशी माहिती नाही, परंतु अनेकांचा असा विश्वास आहे की, हल्ल्यापूर्वी इराणने आपले युरेनियम पिकॅक्स पर्वतावर हलवले असावे, ज्यामुळे इराणला त्यांचा अणुशस्त्र कार्यक्रम पुन्हा सुरू करता येईल.