मोठी बातमी! ओमान, तुर्की, सायप्रसवर आम्ही हल्ले केले नाहीत; इराणच्या दाव्याने खळबळ...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2026 00:42 IST2026-03-06T00:41:06+5:302026-03-06T00:42:52+5:30

Iran Israel War update: "इराण, अमेरिका आणि इस्रायलमधील युद्ध आता ओमान, तुर्की, सायप्रस आणि अजरबैजानपर्यंत पोहोचले आहे. या ४ देशांवर झालेल्या मिसाईल हल्ल्यांमागे नेमका कोणाचा हात आहे? इराणने का फेटाळले आरोप? वाचा सविस्तर बातमी."

Iran Israel War update: Big news! We did not attack Oman, Turkey, Oman, Cyprus; Iran's claim creates a stir... | मोठी बातमी! ओमान, तुर्की, सायप्रसवर आम्ही हल्ले केले नाहीत; इराणच्या दाव्याने खळबळ...

मोठी बातमी! ओमान, तुर्की, सायप्रसवर आम्ही हल्ले केले नाहीत; इराणच्या दाव्याने खळबळ...

मध्यपूर्वेतील तणाव आता टोकाला पोहोचला असून इराण, अमेरिका आणि इस्रायल यांच्यातील युद्ध आता शेजारील देशांमध्येही पसरताना दिसत आहे. अजरबैजान, ओमान, तुर्की आणि सायप्रस या चार महत्त्वाच्या देशांमध्ये गेल्या काही दिवसांत ड्रोन आणि बॅलिस्टिक मिसाईल हल्ल्यांच्या घटना घडल्या आहेत. या हल्ल्यांमागे इराणचा हात असल्याचा संशय व्यक्त केला जात असतानाच, इराणने हे सर्व आरोप फेटाळून लावत याला 'फॉल्स फ्लॅग' कट असल्याचे म्हटले आहे.

या चारही देशांवर आपण हल्ले केले नसल्याचे इराणने स्पष्ट केले आहे. यापैकी ओमान हा देश तर इराणचा मित्र देश आहे. तुर्कीने देखील काही दिवसांपूर्वी अमेरिकेविरोधात इराणची बाजू मांडली होती. इराणवर हल्ले करण्यासाठी आपले एअर बेस वापरण्यास ब्रिटनने अमेरिकेला नकार दिला होता, तसेच आपली रॉयल एअरफोर्स देखील युद्धात उतरणार नसल्याचे स्पष्ट केले होते. यानंतर सायप्रस येथील ब्रिटीश एअरबेसवर ड्रोन हल्ला झाला होता. हा ड्रोन इराणच्या शाहिद मॉडेलसारखा असल्याचे ब्रिटनने म्हटले होते. तसेच हा ड्रोन इराणमधून लाँच झाला नसल्याचेही म्हटले होते. 

इराणविरोधात या देशांना उचकविण्याची ही खेळी असू शकते, असा आरोप तेहरानने केला आहे. या देशांवर हल्ले झाले तर हे देश इराणविरोधात जातील असा यामागे युद्धामागील शक्तींचा कयास होता, जो पूर्णपणे फेल गेला आहे. अजरबैजानच्या नखचिवान भागातील विमानतळावर इराणच्या दिशेने आलेले दोन ड्रोन कोसळले. यात दोन नागरिक जखमी झाले असून अजरबैजानने थेट इराणवर ठपका ठेवला आहे. मात्र, इराणने हा आरोप फेटाळत म्हटले की, "आम्ही अजरबैजानच्या सार्वभौमत्वाचा आदर करतो, हा हल्ला आम्ही केलेला नाही. हा इस्रायलचा कट असू शकतो." इराणने ओमानवरील हल्ल्याच्या बातम्यांना अफवा ठरवले आहे. नाटोच्या हवाई संरक्षण यंत्रणेने तुर्कीच्या सीमेकडे येणारे एक बॅलिस्टिक मिसाईल हवेतच नष्ट केले. हे मिसाईल इराणमधून डागले गेल्याचे संकेत मिळाले होते, पण इराणने "तुर्कीवर हल्ला करण्याचा आमचा कोणताही इरादा नाही," असे स्पष्ट केले आहे.

इराणचा 'फॉल्स फ्लॅग'चा दावा काय?
इराणच्या मते, इस्रायल आणि पाश्चात्य देश मुस्लिम राष्ट्रांमध्ये फूट पाडण्यासाठी आणि इराणला जागतिक स्तरावर एकटे पाडण्यासाठी स्वतःच हे हल्ले घडवून आणत आहेत (फॉल्स फ्लॅग ऑपरेशन). यामुळे संपूर्ण आखाती क्षेत्रात सध्या भीतीचे वातावरण असून युद्धाची व्याप्ती वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Web Title : ईरान ने ओमान, तुर्की, साइप्रस पर हमलों से इनकार किया; झूठे झंडे का दावा

Web Summary : ईरान ने ओमान, तुर्की और साइप्रस पर हमलों में शामिल होने से इनकार किया, इसे ईरान को अलग-थलग करने और संघर्ष भड़काने के लिए 'झूठा झंडा' ऑपरेशन करार दिया। ईरान ने इजरायल पर हमलों की साजिश रचने का आरोप लगाया।

Web Title : Iran Denies Attacks on Oman, Turkey, Cyprus; Claims False Flag

Web Summary : Iran denies involvement in attacks on Oman, Turkey, and Cyprus, labeling it a 'false flag' operation to isolate Iran and incite conflict. Iran accuses Israel of orchestrating the attacks.