खामेनी यांनी राजीनामा द्यावा अन्यथा..; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणच्या माजी प्रमुखाचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2025 15:55 IST2025-06-22T15:55:00+5:302025-06-22T15:55:44+5:30

Iran-Israel War: इराणमध्ये शांतता प्रस्थापित करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे खामेनी राजवटीचा अंत करणे.

Iran-Israel War: Khamenei should resign or else..; Former Iranian leader warns after US attack | खामेनी यांनी राजीनामा द्यावा अन्यथा..; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणच्या माजी प्रमुखाचा इशारा

खामेनी यांनी राजीनामा द्यावा अन्यथा..; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणच्या माजी प्रमुखाचा इशारा

Iran-Israel War:इराणचे निर्वासित राजपुत्र रेझा शाह पहलवी यांनी इराण-इस्रायल संघर्षावर महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी इराणच्या तीन अणुस्थळांवर अमेरिकेने केलेल्या हल्ल्यांसाठी इस्लामिक रिपब्लिकच्या(इराण) अणु महत्त्वाकांक्षेला जबाबदार धरले. तसेच, त्यांनी इराणचे सर्वोच्च नेते खमेनी यांच्या राजीनाम्याची मागणीही केली. शांतता हाच या राजवटीचा अंत करण्याचा एकमेव खात्रीशीर मार्ग आहे, असेही त्यांनी म्हटले.

इराणच्या तीन अणुस्थळांवर झालेल्या हल्ल्यावर प्रतिक्रिया देताना रेझा शाह पहलवी यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले की, 'इराणच्या तीन अणुस्थळांवर झालेले हल्ले हे इस्लामिक रिपब्लिकच्या अणु शस्त्रांच्या विनाशकारी प्रयत्नांचे परिणाम आहेत. यामुळे इराणी लोकांचे हित धोक्यात आले आहे. खमेनी आणि त्यांच्या कोसळणाऱ्या दहशतवादी राजवटीने राष्ट्राला अपयशी ठरवले आहे.'

'खमेनी यांनी राजीनामा द्यावा'
त्यांनी खमेनींना आवाहन केले की, 'तुमच्या भूमिगत बंकरमधून बदला घेण्याचा विचार करण्याऐवजी, इराणी लोकांच्या हितासाठी राजीनामा द्या, जेणेकरून गौरवशाली इराणी राष्ट्र इस्लामिक रिपब्लिकच्या विनाशकारी युगाला मागे टाकू शकेल आणि शांतता, समृद्धी आणि महानतेचा एक नवीन अध्याय सुरू करू शकेल.' रजा शाह यांनी यावर भर दिला की, इराणमध्ये शांतता प्रस्थापित करण्याचा एकमेव खात्रीशीर मार्ग म्हणजे या व्यवस्थेचा (खामेनी राजवटीचा) अंत करणे.

यापूर्वीही टीका केलेली 
रेझा शाह पहलवी यांनी यापूर्वीही इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांच्यावर टीका केली होती. खमेनी घाबरलेल्या उंदरासारखे भूमिगत झाले आहेत, आता त्यांच्याकडे कोणताही मार्ग उरलेला नाही, असे ते म्हणाले होते. तसेच, त्यांनी इराणच्या लोकांना एकत्र येऊन सत्तांतराचे आवाहन केले होते. 

अमेरिकेचा इराणवर हल्ला; चीन, जपान, ओमान..; कोण काय म्हणाले? जाणून घ्या...

कोण आहेत रेझा शाह?
रेझा शाह पहलवी हे शाह मोहम्मद रजा पहलवी यांचे पुत्र आहेत. त्यांनी बराच काळ इराणची सत्ता भोगली होती. १९७९ पर्यंत ते इराणचे प्रमुख होते. परंतु ३७ वर्षांपूर्वी झालेल्या क्रांतीने इराणची धार्मिक-सामाजिक रचना पूर्णपणे बदलून टाकली. त्यानंतर शाह मोहम्मद रजा पहलवी यांना आपला जीव वाचवण्यासाठी इजिप्तला पळून जावे लागले.

Web Title: Iran-Israel War: Khamenei should resign or else..; Former Iranian leader warns after US attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.