इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2025 00:10 IST2025-06-15T00:09:50+5:302025-06-15T00:10:44+5:30

Iran vs Israel war: एपी वृत्तसंस्थेनुसार इस्रायलच्या ड्रोनने इराणच्या दक्षिणेकडे असलेल्या पारस गॅस परिसरातील एका रिफायनरीवर हल्ला केला आहे.

iran israel war: Israeli planes in Iranian skies, attack gas refinery; Defense system destroyed | इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त

इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त

इस्रायलने पुन्हा इराणवर शेकडो विमानांनी हल्ला चढविला आहे. इराणच्या आकाशाच इस्रायलची लढाऊ विमाने घिरट्या घालू लागली असून इराणची एअर डिफेन्स सिस्टीम उध्वस्त करण्यात आली आहे. डिफेन्स सिस्टीम उध्वस्त झाल्यानंतर इस्रायलने मोठा हल्ला करण्याचे वक्तव्य केले होते. 

एपी वृत्तसंस्थेनुसार इस्रायलच्या ड्रोनने इराणच्या दक्षिणेकडे असलेल्या पारस गॅस परिसरातील एका रिफायनरीवर हल्ला केला आहे. इराणच्या मीडियाने ही माहिती दिली आहे. हा अशाप्रकराचा इस्रायलकडून पहिलाच हल्ला असणार आहे. इराण कतारसोबत गॅस क्षेत्रे सामायिक करतो. इराणच्या दक्षिण बुशेहर प्रांतातील साउथ पार्स गॅस फील्डमध्ये आग लागली आहे. हे जगातील सर्वात मोठे नैसर्गिक वायू क्षेत्र आहे. तेल शुद्धीकरण क्षेत्रावर हल्ला झाला तर साहजिकच तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. 

दुसरीकडे इराणने इस्रायलचे तिसरे एफ-१६  लढाऊ विमान पाडल्याचा दावा केला आहे. तर एकूण १० विमाने पाडल्याचा दावा इराणी लष्कराने केला आहे. तर इस्रायली हवाई दलाला इराणची राजधानी तेहरानच्या आकाशात उड्डाण करण्याचे स्वातंत्र्य मिळाले असल्याचे इस्रायली सैन्याने जाहीर केले आहे. इराणी संरक्षण यंत्रणा नष्ट केल्यानंतर हे शक्य झाले आहे. 

Web Title: iran israel war: Israeli planes in Iranian skies, attack gas refinery; Defense system destroyed