शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षीक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
3
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
4
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
5
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीचं धक्कादायक कृत्य
6
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
7
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
8
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
9
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
10
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
11
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
12
कमाल! नणंद-भावजयीने फडकवला यशाचा झेंडा; एक DSP तर दुसरी टॅक्स ऑफिसर, रचला इतिहास
13
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
14
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
15
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
16
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
17
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
18
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
19
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
20
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
Daily Top 2Weekly Top 5

इराणचा 'फतवा'! अमेरिका, इस्रायलला फोटो किंवा व्हिडिओ पाठवल्यास थेट फाशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2026 15:11 IST

Iran-Israel War : इराणने आपल्या नागरिकांसाठी कडक कायदा लागू केला असून शत्रू राष्ट्रांना माहिती दिल्यास मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आहे.

मध्य पूर्व आशियातील युद्ध आता एका अत्यंत भीषण टप्प्यावर पोहोचले आहे. अमेरिका आणि इस्रायलसोबत सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर इराणने आपल्या नागरिकांसाठी अत्यंत कडक आणि प्राणघातक इशारा जारी केला आहे. शत्रू राष्ट्रांना कोणत्याही प्रकारची माहिती पुरवल्यास आता थेट मृत्यूदंडाची शिक्षा दिली जाईल, असे इराणने स्पष्ट केले आहे.

इराणच्या न्यायव्यवस्थेचे प्रवक्ते असगर जहांगीर यांनी माहिती दिली की, गेल्या ऑक्टोबरमध्ये सुधारित करण्यात आलेल्या 'हेरगिरी कायद्या'नुसार आता कडक कारवाई केली जाईल. जर कोणत्याही नागरिकाने अमेरिका किंवा इस्रायलसारख्या 'शत्रू सरकारांना' इराणमधील परिस्थितीचे फोटो किंवा व्हिडिओ पाठवले, तर त्याला फाशीची शिक्षा दिली जाईल. इतकेच नाही तर संबंधित व्यक्तीची सर्व संपत्ती देखील जप्त केली जाणार आहे. युद्धाच्या काळात अंतर्गत माहिती बाहेर जाऊ नये म्हणून इराणने देशातील इंटरनेट बंद ठेवलेले आहे. तरीही माहिती जात आहे, यासाठी इराणने हे पाऊल उचलले आहे.

धार्मिक केंद्रावर भीषण हल्लाउत्तर-पश्चिमी इराणमधील झंजन शहरावर अमेरिका आणि इस्रायलने हवाई हल्ले केले आहेत. 'फार्स' या वृत्तसंस्थेनुसार, या हल्ल्यात झंजन येथील प्रसिद्ध 'आजम हुसैनीया' या धार्मिक केंद्राच्या सोन्याच्या घुमटाचे आणि मिनारांचे मोठे नुकसान झाले आहे. हल्ल्यानंतर इराणच्या रेड क्रिसेंट सोसायटीने तातडीने बचाव कार्य सुरू केले असून ढिगाऱ्याखाली अडकलेल्या जखमींना तेहरानमधील रुग्णालयांमध्ये हलवण्यात येत आहे.

नौसेना कमांडर तंगसिरी यांना अखेरचा निरोपइराणसाठी सर्वात मोठा धक्का म्हणजे रिव्होल्यूशनरी गार्ड्सचे नौसेना कमांडर अलीरेजा तंगसिरी यांचा मृत्यू. इस्रायलने केलेल्या भीषण हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तंगसिरी यांनी सोमवारी अखेरचा श्वास घेतला. आज बंदर अब्बास येथे त्यांच्या अंत्ययात्रेसाठी हजारो इराणी नागरिकांनी गर्दी केली होती. तंगसिरी हे इराणच्या नौदलातील अत्यंत प्रभावशाली व्यक्तिमत्व मानले जात होते.

टॅग्स :US Israel Iran Warअमेरिका-इस्रायल-इराण वॉरIranइराणWarयुद्ध