'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 18:13 IST2025-06-26T18:12:51+5:302025-06-26T18:13:40+5:30

Iran-Israel War: इस्रायल आणि इराणमध्ये युद्धविराम जाहीर झाल्यानंतर इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांनी अमेरिकेवर जोरदार टीका केली.

Iran-Israel War: 'Iran slapped America', Khamenei claims victory after declaring ceasefire with Israel | 'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा

'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा

Iran-Israel War: इस्रायल आणि इराणमध्येयुद्धविराम जाहीर झाल्यानंतर इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांनी गुरुवारी(दि.२६) इस्रायलविरुद्धच्यायुद्धात विजयाचा दावा केला. त्यांनी म्हटले की, इराणने अमेरिकेला जोरदार धोबाडीत मारली. अमेरिकेने इस्रायलला वाचवण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. अमेरिकेच्या मध्यस्थीने मंगळवारी लागू झालेल्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर खामेनी यांनी ही पहिलीच टिप्पणी आहे.

अमेरिकेने हस्तक्षेप का केला? खामेनी म्हणाले
इराणच्या सरकारी दूरचित्रवाणीवर प्रसारित झालेल्या व्हिडिओ संदेशात खामेनी म्हणाले की, इस्लामिक रिपब्लिक विजयी झाला अन् अमेरिकेच्या थोबाडीत मारली. खामेनी यांनी आपल्या भाषणात अमेरिकेच्या मध्यस्थीवरही भाष्य केले. ते म्हणाले, अमेरिकेने हस्तक्षेप केला, कारण त्यांना वाटले की, जर त्यांनी हस्तक्षेप केला नाही, तर झिओनिस्ट राजवट (इस्रायल) पूर्णपणे नष्ट होईल. या युद्धाचा अमेरिकेला काहीच फायदा झाला नाही, असा दावाही त्यांनी यावेळी केला.

१३ जून नंतर पहिल्यांदाच खामेनी सर्वांसमोर आले
१३ जून रोजी युद्ध सुरू झाल्यापासून सर्वोच्च नेते खामेनी सार्वजनिक ठिकाणी दिसले नव्हते. इस्रायलने इराणच्या अणु तळांवर हल्ला केल्याने युद्ध सुरू झाले. तेव्हापासून असे म्हटले जात होते की, खामेनी एका गुप्त ठिकाणी लपून बसले आहेत. १९ जून रोजी त्यांनी एक व्हिडिओ संदेश जारी केला, परंतु तो त्यांच्या बंकरमधूनच रेकॉर्ड करण्यात आला. 

'इराणकडे भरपूर तेल...', ट्रम्प यांचा इराणी तेलावर डोळा; तीन दिवसात तीनवेळा केला उल्लेख

आता गुरुवारी त्यांनी आणखी एक व्हिडिओ संदेश जारी केला, जो इराणी सरकारी चॅनेल आणि त्यांच्या सोशल मीडिया पेजवर टाकण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी इस्रायलवरील विजयाबद्दल आपल्या नागरिकांना अभिनंदन केले आणि हा ऐतिहासिक क्षण असल्याचे म्हटले.

Web Title: Iran-Israel War: 'Iran slapped America', Khamenei claims victory after declaring ceasefire with Israel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.