'खमेनी यांना काही झाले तर...', शियांच्या सर्वात मोठ्या धार्मिक नेत्याचा इराकमधून ट्रम्प यांना इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 18:25 IST2025-06-19T18:24:42+5:302025-06-19T18:25:41+5:30

Iran Israel War: शिया धर्मगुरू अयातुल्ला अली सिस्तानी यांनी आंतरराष्ट्रीय समुदायाला युद्ध संपवण्यासाठी शांततापूर्ण तोडगा काढण्याचे आवाहन केले.

Iran Israel War: 'If anything happens to Khamenei...', Shia's top religious leader warns Trump from Iraq | 'खमेनी यांना काही झाले तर...', शियांच्या सर्वात मोठ्या धार्मिक नेत्याचा इराकमधून ट्रम्प यांना इशारा

'खमेनी यांना काही झाले तर...', शियांच्या सर्वात मोठ्या धार्मिक नेत्याचा इराकमधून ट्रम्प यांना इशारा

Iran Israel War: इस्रायल आणि इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे संपूर्ण जगाचे लक्ष मध्यपूर्वेकडे लागले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या युद्धातइस्रायलची बाजू घेतली असून, इराणला बिनशर्त आत्मसमर्पण करण्याचा इशारा दिला आहे. तसेच, अयातुल्ला अली खमेनी कुठे लपले आहेत, हे आम्हाला माहित आहे, असे सूचक विधानही अमेरिकेने केले आहे.

इराकचे अमेरिकेला प्रत्युत्तर
न्यूज एजन्सी एफपीच्या वृत्तानुसार, डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराकचे सर्वोच्च शिया धर्मगुरू अयातुल्ला अली सिस्तानी यांनी अमेरिकेला प्रत्युत्तर दिले आहे. इराणच्या सर्वोच्च नेतृत्वाला लक्ष्य केले, तर या प्रदेशात अराजकता पसरेल, गंभीर परिणाम भोगावे लागतील. यामुळे या प्रदेशातील लोकांच्या अडचणीही वाढतील गंभीर नुकसान होईल, असे सिस्तानी यांनी म्हटले. तसेच, त्यांनी आंतरराष्ट्रीय समुदायाला हे युद्ध संपवण्यासाठी आणि इराणच्या अणुकार्यक्रमावर शांततापूर्ण तोडगा काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आवाहनदेखील केले.

इस्रायलविरोधात एकही मुस्लिम देश इराणच्या बाजूने नाही; आता खमेनी सरकारपुढे कोणता मार्ग?

अली सिस्तानी यांचे जगभरात अनुयायी 
अल-सिस्तानी हे शिया मुस्लिमांमधील सर्वोच्च धार्मिक नेत्यांपैकी एक मानले जातात. जगभरात त्यांचे अनुयायी असून, भारतातील बहुतांश शिया त्यांनाच आपला गुरू मानतात. सिस्तानी फार कमीवेळा माध्यमांसमोर येतात. २०१४ मध्ये त्यांनी इराकी लोकांना एकत्र येऊन आयसिसविरुद्ध त्यांच्या देशाचे रक्षण करण्याचे आवाहन केले होते. इराकमधील सद्दाम हुसेन यांच्या सरकारशीही त्यांचे संबंध चांगले नव्हते. बीबीसीच्या वृत्तानुसार, त्यांना बराच काळ घरात नजरकैदेत राहावे लागले. ते राजकारणापासूनही दूर राहतात. 

Web Title: Iran Israel War: 'If anything happens to Khamenei...', Shia's top religious leader warns Trump from Iraq

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.