इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2025 08:37 IST2025-06-15T08:34:08+5:302025-06-15T08:37:04+5:30
Iran Israel War: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे उच्च लष्करी कमांडर, अणुशास्त्रज्ञांचा मृत्यू

इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
Iran Israel War: इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाने आता नवी दिशा घेतली आहे. इस्रायल आणि इराण यांच्यात युद्धाची सुरुवात झाली आहे. इराणविरुद्ध 'ऑपरेशन रायझिंग लायन' सुरू झाल्यानंतर दोन्ही देशांमधील तणाव सुरूच आहे. शनिवारी रात्रीही दोन्ही देशांनी एकमेकांवर हल्ला केला. शनिवारी रात्री इस्रायली हवाई दलाने इराणच्या इतर भागांसह राजधानी तेहरानवरही हल्ला केला. या हल्ल्यात तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, न्यूक्लियर प्रयोगशाळा, न्यूक्लियर मुख्यालय ( nuclear headquarters ) आणि दोन रिफायनरीजना लक्ष्य करण्यात आले. हल्ल्यानंतरच्या छायाचित्रांमध्ये आग आणि मोठ्या प्रमाणात नुकसान दिसून येते. त्यानंतर प्रत्युत्तरात इराणने इस्रायली बंदर शहर हैफासह संपूर्ण इस्रायलवर क्षेपणास्त्रे डागली. या हल्ल्यात उच्च लष्करी कमांडर आणि अणुशास्त्रज्ञांचा ( nuclear scientist ) मृत्यू झाला.
📢 Tehran is burning. Power outages across northern Tehran.
— The Analyzer (News Updates🗞️) (@Indian_Analyzer) June 14, 2025
~ Flames engulf the skyline as #Israel reportedly strikes Shahran Oil Depot west of the capital.
Israel had warned: target our civilians, and you’ll pay a heavy price. #IsraeliranWarpic.twitter.com/0uSsPmrN5M
इस्रायलचा दावा
इस्रायलने म्हटले आहे की ते इराणचा अणु कार्यक्रम संपवण्याचा प्रयत्न करीत आहेत, जो त्यांच्या अस्तित्वासाठी धोका मानतो. इस्रायल डिफेन्स फोर्सेस (IDF) ने ट्विट केले की, "IDF ने तेहरानमधील इराणी राजवटीच्या अण्वस्त्र प्रकल्पाशी संबंधित लक्ष्यांवर अनेक हल्ले केले आहेत. या लक्ष्यांमध्ये इराणी संरक्षण मंत्रालयाचे मुख्यालय, SPND अण्वस्त्र प्रकल्पाचे मुख्यालय आणि अण्वस्त्रे विकसित करण्याच्या इराणी राजवटीच्या प्रयत्नांना चालना देणारी इतर ठिकाणे आणि इराणी राजवटीने आपले अण्वस्त्रे लपवलेली ठिकाणे यांचा समावेश होता." इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी सांगितले की त्यांचे सैन्य अयातुल्ला राजवटीच्या प्रत्येक ठिकाणावर हल्ला करेल.
This is the capital of Iran, Tehran, tonight.
— Hananya Naftali (@HananyaNaftali) June 14, 2025
Israel promised that if the regime targets Israeli civilians, it will pay a very heavy price. There is currently a widespread power outage in northern Tehran. pic.twitter.com/SzlSVfntQ7
इराणकडून प्रतिहल्ला
दुसरीकडे इराणने त्यांच्या न्यूक्लियर आस्थापनांवर, हवाई संरक्षण यंत्रणेवर आणि इतर लक्ष्यांवर केलेल्या हवाई हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर दिले. इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) ने म्हटले आहे की, त्यांनी इस्रायलच्या ऊर्जेशी संबंधित पायाभूत सुविधांना लक्ष्य केले. इस्रायली आपत्कालीन सेवेने सांगितले की, हल्ल्यांमध्ये देशाच्या उत्तरेकडील भागात किमान तीन लोक ठार झाले आहेत.
इज़राइल पर ईरान के ताज़ा हमले… pic.twitter.com/CKkNn0BXbN
— Umashankar Singh उमाशंकर सिंह (@umashankarsingh) June 15, 2025
इराणने अमेरिकेसोबतची अणु चर्चा रद्द केली
रविवारी इराणने एका महिन्याहून अधिक काळ सुरू असलेल्या अणु चर्चा स्थगित केल्या कारणामुळे वादंग निर्माण झाला. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची म्हणाले की, इस्रायलच्या हल्ल्यांनंतर चर्चा करणे 'अयोग्य' ठरेल. दरम्यान, इराणी सरकारी टेलिव्हिजनने सांगितले की शहराच्या पूर्व आणि पश्चिम भागात स्फोटांचे आवाज ऐकू आले. या घडामोडींनंतर, असे दिसते की ही लढाई बराच काळ चालू शकते.