हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 19:09 IST2025-06-24T19:06:25+5:302025-06-24T19:09:49+5:30

Iran-Israel war: युद्धविराम जाहीर झाल्याच्या काही तासांतच इस्रायलने इराणवर हल्ला केला आहे.

Iran-Israel war: 'Cannot stop the attack, will have to respond', Netanyahu's response after Trump's warning | हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर

हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर

Iran-Israel war: इराण आणि इस्रायलने आज सकाळी युद्धविराम जाहीर केला होता, मात्र काही तासांतच परिस्थिती पुन्हा जैसेथे झाली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने तेहरानजवळील इराणी रडार साइटवर हवाई हल्ला केल्यामुळे हे युद्ध आणखी भडकण्याची शक्यता आहे. अ‍ॅक्सिओसच्या वृत्तानुसार, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी ट्रम्प यांना स्पष्टपणे सांगितले की, हल्ला थांबवू शकत नाही. इराणच्या कृतीला प्रत्युत्तर म्हणून काहीतरी करणे आवश्यक आहे.

इस्रायलचा इस्रायलच्या रडार साइटवर हल्ला
इस्रायल आणि इराणने युद्धविराम जाहीर केला होता, मात्र आता हे युद्ध पुन्हा सुरू झाले आहे. इराणने युद्धबंदीचे उल्लंघन करुन दोन बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागल्याच्या प्रत्युत्तरात हा हल्ला केल्याचा दावा इस्रायलने केला आहे. दरम्यान, इराणी माध्यमे मिझान आणि शारघने वृत्त दिले की, इस्रायलने उत्तर इराणमधील बाबोलसर शहरावर हल्ला केला आहे. तर, इस्रायली आर्मी रेडिओने तेहरानजवळील रडार साइटला लक्ष्य केल्याची पुष्टी केली आहे.

डोनाल्ट ट्रम्प नाराज
डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमधून माध्यमांशी बोलताना या संपूर्ण घटनेवर नाराजी व्यक्त केली. ट्रम्प यांनी युद्धबंदीची घोषणा केल्यानंतर इस्रायलने इराणवर शस्त्रसंधीच्या उल्लंघनाचा आरोप केला होता. इराणने त्यापूर्वीच आपण हल्ला केला होता, असे सांगत हे आरोप फेटाळले होते. यानंतर इस्रायलने देखील इराणवर हल्ले चढविले आहेत. यामुळे आता ट्रम्प भडकले आहेत.  इराणवर मी खूश नाहीय पण इस्रायलवर खूप नाराज असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे. दरम्यान इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणने इशारा दिला आहे की, याचा प्रतिसाद जलद आणि 'दुप्पट विनाशकारी' असेल. इराणी रिव्होल्यूशनरी गार्ड (IRGC) ने स्पष्ट केले आहे की 'हा फक्त इशारा नाही तर सुरुवात आहे.'

Web Title: Iran-Israel war: 'Cannot stop the attack, will have to respond', Netanyahu's response after Trump's warning