इराण-इस्त्रायल युद्ध पेटले! ४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा, थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2025 19:20 IST2025-06-23T19:19:37+5:302025-06-23T19:20:51+5:30
उत्तर इस्रायलमध्ये इराणकडून अनेक क्षेपणास्त्रे डागण्यात आली. या क्षेपणास्त्र हल्ल्यांचे अनेक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

इराण-इस्त्रायल युद्ध पेटले! ४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा, थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल!
इराण आणि इस्रायल यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस अधिकच भीषण रूप धारण करत आहे. रविवार सकाळी अमेरिकेने इराणच्या फोर्डो, नतांझ आणि इस्फहान या तीन महत्त्वाच्या अणु ठिकाणांना लक्ष्य करून ते उद्ध्वस्त केले होते. यानंतर इराणने अमेरिकेला उघडपणे धमकी दिली असून, अणु ठिकाणांवरील हल्ला म्हणजे इराणच्या सैन्यावर हल्ला असल्याचे म्हटले आहे.
इराणी क्षेपणास्त्रांनी इस्रायलला हादरवले!
सोमवारी दोन्ही देशांनी एकमेकांवर क्षेपणास्त्रे डागली. उत्तर इस्रायलमध्येही इराणकडून अनेक क्षेपणास्त्रे डागण्यात आली. या क्षेपणास्त्र हल्ल्यांचे अनेक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. एका व्हिडिओमध्ये इस्रायलमधील एश्दोद शहरावर झालेल्या इराणी क्षेपणास्त्र हल्ल्याचे क्षण कैद झाले आहेत. हे एक डॅशकॅम फुटेज आहे, ज्यात एका गाडीजवळ क्षेपणास्त्र स्फोटानंतर दगड आणि ढिगारे आकाशात कसे उडतात हे स्पष्ट दिसते. काही क्षणातच गाडीची पुढील काच पूर्णपणे धुळीने झाकली जाते. मिळालेल्या माहितीनुसार, हे क्षेपणास्त्र एश्दोदजवळील एका पॉवर स्टेशनवर आदळले.
WOW! Incredible footage captured from the dashcam of an Israeli driver in Southern Israel shows the moment an Iranian missile struck just a short distance from his car! Thankfully, despite all 10 missiles launched this morning in 5 separate volleys, there are no reports of… pic.twitter.com/oTAwVR3188
— ONE FOR ISRAEL Ministry (@oneforisrael) June 23, 2025
४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा
'टाइम्स ऑफ इस्रायल'च्या वृत्तानुसार, या हल्ल्यात अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही, मात्र शहरातील इतर भागांवर याचा परिणाम दिसून येत आहे. संपूर्ण इस्रायलमध्ये युद्ध सायरन वाजत होते. इराणने सुमारे ४० मिनिटे इस्रायलवर अनेक क्षेपणास्त्रे डागली, ज्यामुळे या क्षेत्रातील तणाव शिगेला पोहोचला आहे.