"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 11:52 IST2025-06-19T11:49:51+5:302025-06-19T11:52:48+5:30

Iran Israel Conflict: एकीकडे युक्रेनविरुद्धच्या युद्धात गुंतलेले रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनीही इस्राइल आणि इराण यांच्यातील संघर्षामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी मध्यस्थी करण्याच्या दिलेेल्या प्रस्तावावरून

Iran Israel Conflict: "First resolve your dispute with Ukraine, then...", Putin taunts Trump over concerns about the Middle East | "आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  

"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  

गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या इस्राइल आणि इराणमधील संघर्षाने भीषण रूप धारण केले आहे. त्यामुळे मध्य-पूर्वेकडील देशांमध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत जागतिक पातळीवर चिंता व्यक्त होत आहे. तसेच इस्राइल आणि इराणमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, एकीकडे युक्रेनविरुद्धच्या युद्धात गुंतलेले रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनीही इस्राइल आणि इराण यांच्यातील संघर्षामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी मध्यस्थी करण्याचा प्रस्ताव दिला आहे. दरम्यान, व्लादिमीर पुतीन यांच्या प्रस्तावावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे. ‘’आधी रशिया आणि युक्रेनमधील वाद निस्तरा, मग मध्य पूर्वेची चिंता करा’’, असा टोला ट्रम्प यांनी पुतीन यांना लगावला आहे.

डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, ‘’मी रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांच्याशी संवाद साधला होता. त्यावेळी पुतीन यांनी इस्राइल आणि इराण यांच्यातील संघर्षामध्ये मध्यस्थी करण्याचा प्रस्ताव दिला होता. त्यावर मी त्यांना सांगितले की, एक काम करा, आधी तुमचा युक्रेनसोबतचा वाद मिटवा. मग बाकी जगाची चिंता करा’’. आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या या वक्तव्यार व्लादिमीर पुतीन हे काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेलं युद्ध हे मूर्खपणा आहे. तसेच मी त्यावेळी राष्ट्राध्यक्ष असतो तर हे युद्ध कधीच झालं नसतं. तसेच पुतीन यांची अशी आगळीक करण्याची हिंमतही झाली नसती, असा दावाही ट्रम्प यांनी केला. त्याबरोबरच रशिया आणि युक्रेन युद्धामध्ये मारल्या गेलेल्या लोकांचा खरा आकडा लपवण्याच येत आहे. या युद्धात खूप मोठ्या प्रमाणावर लोक मारले गेले आहेत. जेवढा आकडा सांगितला जातोय त्यापेक्षा खरा आकडा कितीतरी अधिक आहे. तिथे एक इमारत कोसळते आणि सांगितलं जातं की, कुणी जखमी देखील झालेलं नाही. ही गंमत आहे काय? असा सवालही ट्रम्प यांनी विचारला.  

Web Title: Iran Israel Conflict: "First resolve your dispute with Ukraine, then...", Putin taunts Trump over concerns about the Middle East