गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या अमेरिका-इराणयुद्धाला आता पूर्णविराम मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प उद्या (२ एप्रिल) भारतीय वेळेनुसार पहाटे ६:३० वाजता राष्ट्राला संबोधित करणार आहेत. या संबोधनात ते इराणयुद्धाच्या समाप्तीची अधिकृत घोषणा करू शकतात, अशी दाट शक्यता आहे.
ट्रम्प यांनी नुकतेच संकेत दिले आहेत की अमेरिकेने आपले लष्करी उद्दिष्ट साध्य केले आहे. विशेष म्हणजे, जागतिक व्यापारासाठी महत्त्वाचा असलेला 'होर्मुजचा जलमार्ग' खुला असो वा बंद, त्याने अमेरिकेला काही फरक पडत नाही, असे धाडसी विधान त्यांनी केले आहे. ट्रम्प यांच्या "युद्ध २-३ आठवड्यात संपेल" या विधानामुळे जागतिक राजकारणात खळबळ उडाली आहे.
चीन-पाकिस्तानचा 'पंचसूत्री' शांती प्रस्तावएकीकडे अमेरिका घोषणा करण्याच्या तयारीत असतानाच, ३१ मार्च रोजी बीजिंगमध्ये चीन आणि पाकिस्तान यांच्यात उच्चस्तरीय बैठक पार पडली. चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी आणि पाकिस्तानचे इशाक डार यांनी इराण युद्धावर 'पंचसूत्री शांतता योजना' मांडली आहे. यात तात्काळ युद्धबंदी आणि चर्चेवर भर दिला आहे. इराणने पाकिस्तानच्या थेट मध्यस्थीला विरोध केला असला, तरी शांततेच्या आवाहनाचे स्वागत केले आहे.
शेअर बाजारात 'सुनामी'ट्रम्प यांच्या विधानाचे पडसाद आशियाई शेअर बाजारात उमटले आहेत. युद्ध संपण्याच्या आशेने गुंतवणूकदारांनी जोरदार खरेदी केली.
दक्षिण कोरिया (KOSPI): ६% पेक्षा जास्त उसळी.
जपान (Nikkei 225): ३.८७% वाढ.
सिंगापूर (Straits Times): १.७% ची तेजी.
UAE कडून लष्करी कारवाईचे संकेत?दुसरीकडे, युएई होर्मुजचा जलमार्ग सुरू करण्यासाठी लष्करी बळाचा वापर करण्याच्या तयारीत असल्याची बातमी 'टाइम्स ऑफ इस्रायल'ने दिली आहे. यासाठी संयुक्त राष्ट्रात प्रस्ताव आणण्याची आणि आंतरराष्ट्रीय लष्करी युती करण्याची तयारीही सुरू आहे.
Web Summary : Trump may announce the end of the Iran conflict. China and Pakistan propose peace talks. Asian markets surge on hopes of de-escalation. UAE considers military action to keep Hormuz Strait open.
Web Summary : ट्रंप ईरान संघर्ष की समाप्ति की घोषणा कर सकते हैं। चीन और पाकिस्तान ने शांति वार्ता का प्रस्ताव रखा है। तनाव कम होने की उम्मीद से एशियाई बाजारों में उछाल आया। यूएई होर्मुज जलडमरूमध्य को खुला रखने के लिए सैन्य कार्रवाई पर विचार कर रहा है।