इराणने अमेरिकेचा बहरीनमधील हवाई तळ केला उद्ध्वस्त; इस्रायलने केला पलटवार, तेहरान-बेरुतमध्ये हल्ले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2026 14:30 IST2026-03-03T14:28:05+5:302026-03-03T14:30:27+5:30

Iran vs America Latest Update: इस्रायल-अमेरिका विरुद्ध इराण संघर्ष दिवसेंदिवस चिघळताना दिसत आहेत. सर्वोच्च नेते अयातुल्लाह अली खामेनेई यांच्या हत्येनंतर इराण खवळला असून, थेट अमेरिकेलाच लक्ष्य करताना दिसत आहे. 

Iran destroys US air base in Bahrain; Israel attacks Tehran-Beirut | इराणने अमेरिकेचा बहरीनमधील हवाई तळ केला उद्ध्वस्त; इस्रायलने केला पलटवार, तेहरान-बेरुतमध्ये हल्ले

इराणने अमेरिकेचा बहरीनमधील हवाई तळ केला उद्ध्वस्त; इस्रायलने केला पलटवार, तेहरान-बेरुतमध्ये हल्ले

Iran Attack on US baharin air base: अमेरिकेने इस्रायलच्या मदतीने इराणवर सर्वात मोठा आघात केला. २८ फेब्रुवारी २०२६ रोजी इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह अली खामेनेई यांना हल्ला करून मारले. या घटनेनंतर इराण खवळला असून, इराणने शेजारी देशांमध्ये असलेल्या अमेरिकेच्या सर्वच ठिकाणांना लक्ष्य केले आहे. इराणने आता दावा केला आहे की, त्यांनी बहरीनमधील अमेरिकेचा हवाई तळ उद्ध्वस्त केला आहे. यापूर्वी इराणने रियाधमधील अमेरिकेच्या दूतावासावरच दोन हल्ले केले आहेत.

मंगळवारी (३ मार्च) इराणने अमेरिकेच्या बहरीनमधील हवाई तळालाच लक्ष्य केल्याची माहिती समोर आली. इराणने अमेरिकेच्या हवाई तळावर दोन तीव्र हल्ले केले, यात हवाई तळाचे मोठे नुकसान झाल्याचे रिपोर्ट्समध्ये म्हटले जात आहे. 

ड्रोन्स आणि मिसाईलचा हल्ला

इराणच्या रिव्हॉल्युशनरी गाार्ड कोरशी संबंधित फार्स वृत्त संस्थेने याबद्दलचे वृत्त दिले असून, व्हिडीओही प्रसिद्ध केला आहे. ज्यात दूरच्या ठिकाणांवर हल्ले केले जात असल्याचे दिसत आहेत. या रिपोर्टमध्ये दावा केला गेला आहे की, आयआरजीसीच्या ड्रोन्स आणि मिसाईल हल्ल्यामुळे बहरीनमधील शेख ईसा परिसरात असलेल्या अमेरिकेच्या हवाई तळावरील कमांड आणि अधिकाऱ्यांची इमारत उद्ध्वस्त करण्यात आली आहे. त्याचबरोबर इंधनाच्या टाक्यांमध्येही स्फोट झाला आहे. 

बहरीनमधील हवाई तळावर हल्ल्याबद्दल इराणकडून दावा केला गेला असला, तरी अमेरिकेने अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही. आधीही अमेरिकेच्या नौदलाच्या तळावरुन धुराचे मोठे लोट दिसले होते. 

इस्रायलचे तेहरान, बेरूतमध्ये हल्ले 

दरम्यान, इस्रायलने इराण आणि लेबनानवरील हल्ले वाढवले आहेत. इस्रायलच्या लष्कराकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनात, इराणची राजधानी तेहरान आणि लेबनानची राजधानी बेरूतमधील लष्करी ठिकाणांवर हल्ले केले जात आहे, असे म्हटले आहे. 

इस्रायल आता तेहरान आणि बेरूतमध्ये असलेल्या लष्करी ठिकाणांना एकत्रच लक्ष्य करत आहे. आयडीएफचे प्रवक्ते अविचे अद्रई यांनी सांगितले की, मोठ्या प्रमाणात हवाई हल्ले सुरू आहेत. आम्ही हिजबुल्लाहचे मुख्य नियंत्रण केंद्र आणि शस्त्र गोदामांवर हल्ले करत आहोत. 

Web Title : ईरान का दावा: बहरीन में अमेरिकी अड्डा तबाह; इस्राइल ने तेहरान, बेरूत पर हमला किया।

Web Summary : खामेनेई की मौत के बाद, ईरान ने अमेरिका के बहरीन स्थित अड्डे पर ड्रोन और मिसाइलों से हमला किया। इस्राइल ने एक साथ तेहरान और बेरूत में सैन्य ठिकानों पर हमला किया, जिससे क्षेत्रीय तनाव बढ़ गया। अमेरिका ने बहरीन पर हमले की पुष्टि नहीं की है।

Web Title : Iran claims US Bahrain base destroyed; Israel strikes Tehran, Beirut.

Web Summary : Following Khamenei's death, Iran retaliated by attacking US Bahrain base with drones and missiles. Israel simultaneously struck military targets in Tehran and Beirut, escalating regional tensions. US has not confirmed the Bahrain attack.