Iran Attack on US: इराणने डागले शाहेद-१३६ ड्रोन्स, दुबईतील अमेरिकेचे लष्करी तळ हादरले, हल्ल्याचा व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2026 10:59 IST2026-03-03T10:57:04+5:302026-03-03T10:59:13+5:30
इराणकडून अमेरिकेच्या ठिकाणांना लक्ष्य केले जात असून, एक व्हिडीओ समोर आला आहे. इराणने अमेरिकेच्या दुबईतील तळाला लक्ष्य केले आहे.

Iran Attack on US: इराणने डागले शाहेद-१३६ ड्रोन्स, दुबईतील अमेरिकेचे लष्करी तळ हादरले, हल्ल्याचा व्हिडीओ
इराणने युएईतील दुबईमध्ये असलेल्या अमेरिकेच्या ठिकाणांना लक्ष्य करत हवाई हल्ला चढवला.. इराणी माध्यमांच्या रिपोर्ट्सनुसार, इराणने शाहेद १३६ हे ड्रोन्स डागत अमेरिकेच्या लष्करी अधिकारी असलेल्या इमारतीवरच हल्ला केला. याचा एक व्हिडीओ समोर आला असून, मोठा स्फोट होताना दिसत आहे.
इस्रायल आणि अमेरिकेने संयुक्तपणे इराणवर हल्ले सुरू केले. त्यानंतर इराणने इस्रायलबरोबरच अमेरिकेच्या इतर देशातील ठिकाणांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली. इराण शेजारी असलेल्या इतर देशातील अमेरिकेच्या हवाई तळे, दूतावास आणि इतर ठिकाणांवर इराणकडून मिसाईल आणि ड्रोन्स डागले जात आहेत.
दुबईतील अमेरिकेच्या लष्करी इमारतीवर हल्ला
इराणने शाहेद १३६ ड्रोन्सच्या मदतीने दुबईतील अमेरिकेच्या एका ठिकाणावर हल्ला केला. दुबईत अमेरिकेचे लष्करी अधिकारी असलेल्या इमारतीवर इराणने ड्रोन्स डागले. त्यानंतर प्रचंड मोठा स्फोट झाला.
A Shahed 136 drone delivered a significant impact on a building in Dubai where American military personnel were stationed.
— Press TV 🔻 (@PressTV) March 3, 2026
Follow https://t.co/B3zXG73Jympic.twitter.com/3FUaXDlTS2
यापू्र्वीही इराणने सौदी अरेबियातील अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला केला होता. इराणने केलेल्या हवाई हल्ल्यानंतर दूतावासाजवळ आग लागली होती. मात्र, रिपोर्ट्सनुसार त्यावेळी दूतावास रिकामे करण्यात आलेले होते.
कतारने इराणची दोन लढाऊ विमाने पाडली
कतारच्या संरक्षण मंत्रालयानेही इराणकडून होत असलेल्या हल्ल्यांबद्दल म्हटले आहे की, हल्ले सुरू झाल्यानंतर देशावर डागण्यात आलेल्या बहुतांश इराणी मिसाईल हवेत नष्ट केल्या गेल्या. तीन क्रूझ मिसाईल्स, १०१ बॅलेस्टिक मिसाईल्सपैकी ९८, ३९ ड्रोन्सपैकी २४ आणि एसयू २ लढाऊ विमाने पाडली गेली आहेत.
सौदी अरेबियाच्या संरक्षण मंत्रालयानेही निवेदन प्रसिद्ध केले आहे. संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते मेजर जनरल तुर्की अल मलिकी यांनी सांगितले की, रियाद आणि अल खार्ज शहरांजवळ ८ ड्रोन्स रोखण्यात आले आणि पाडण्यात आली.